Krishi 24

राज्य सरकारचे महिलांना मोठे गिफ्ट, एसटी प्रवासासाठी तिकिट दरात सरसकट ५० टक्के सूट

msrtc ticket discounts

Maharashtra Budget ST Bus Concession : राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या. अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्याच घटकांसाठी घोषणा केल्या. महिलांना एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास केल्यास तिकीट दरात 50 टक्क्यांची सवलत जाहीर करण्यात आली आहे. या महिला प्रवाशांच्या तिकीट दरातील 50 टक्के शुल्क प्रतिपूर्ती महाराष्ट्र सरकार करणार आहे. 

ज्येष्ठांसोबत महिलांनाही सवलत

एसटी महामंडळाची लालपरी ही ग्रामीण भागाची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठापर्यंत लालपरी सर्वांना आपल्या ठिकाणापर्यंत पोहचवते. एसटी प्रवास सुरक्षित असतो यामुळेच अनेक महिला देखील एसटीतून प्रवासाला प्राधान्य देतात. एसटीतर्फे 65 वर्ष पूर्ण झालेल्यांना अर्धा तिकिटाच्या रकमेत प्रवास होता. त्यानंतर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत 75 वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये मोफत प्रवास सवलत देण्यात आली आहे व त्यानंतर आता महिलांना देखील 50% तिकीटात सूट देण्याच निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

महिला वर्गातून निर्णयाचे स्वागत

राज्य सरकारने महिलांना एसटी बस तिकीट दरात सवलत देण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे महिला वर्गाकडून स्वागत होत आहे. ज्या महिला नेहमीच लांब पल्ल्याचा प्रवास करतात, त्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रवाशांसाठी याआधीच सवलत जाहीर करण्यात आली आहे. जवळपास 30 प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात येतात. या सवलतीची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला करण्यात येते. राज्य परिवहन महामंडळांकडून 30 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येत आहेत. 

एसटी बसेसमधून प्रवास करणाऱ्यांना कोणत्या घटकांना किती सवलत?

सवलतींचा तपशीलसवलत बससेवा प्रकारप्रवास भाड्यातील किती टक्के सवलत शासन प्रतिपूर्ती
1स्वातंत्र सैनिक व त्याचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलतसाधी, निमआराम, आराम,वातानुकुलित100प्रति लाभार्थी रुपये 4000/  8000 किमी
2डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलतसाधी, निमआराम, आराम100प्रति लाभार्थी रुपये 4000/  8000 किमी
3अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इयत्ता पाचवी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थीनीसाठीसाधी100 
4शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकार-शिवशाही (शयनयान) बस 8000 किमी पर्यंतसाधी, निमआराम,
शिवशाही ( आसनी व शयनयान)
100 
5राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकसाधी, निमआराम, आराम,वातानुकुलित,
शिवशाही (आसनी व शयनयान) 
50 4000 किमीपर्यंत एकत्रीत(साधी, निमआराम, आराम, वातानुकुलित,
शिवशाही (आसनी व शयनयान)
6 राज्यातील 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिक साधी, निमआराम, आराम,वातानुकुलित,
शिवशाही (आसनी व शयनयान)
100 —
7विद्यार्थी मासिक पास सवलतसाधी66.67 
8विद्यार्थ्यांना नैमित्तिक करारावर देण्यात येणारी सवलतसाधी50 
9विद्यार्थ्यांना मोठया सुटृीत मुळ गावी येणे जाणे, परिक्षेला जाणे, शैक्षणिक कॅम्पला जाणे, आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्या/येण्या साठीची सवलतसाधी50 
10अंध व अंपग व्यक्तीसाधी, निमआराम75 
  शिवशाही (आसनी)70 
1165 टक्क्यांवरील अंध व अंपग व्यक्ती तसेच त्यांचे मदतनीससाधी, निमआराम50 
  शिवशाही (आसनी)45 
12क्षय रोगी वैदयकीय उपचारासाठीसाधी75प्रति प्रवास 50 किमी
13कर्क रोगी वैदयकीय उपचारासाठीसाधी75प्रति प्रवास 1500 किमी
14कृष्ठ रोगी वैदयकीय उपचारासाठीसाधी75प्रति प्रवास 50 किमी
15राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठीसाधी33.33 
16विद्यार्थी जेवणाचे डबेसाधी100 
17अर्जुन, द्रोणाचार्य, दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूसाधी, निमआराम, आराम,वातानुकुलित100रुपये  2000 पर्यंत
18आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलतसाधी, निमआराम, आराम100रुपये 1000 पर्यंत
19लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी व त्यांचे साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलतसाधी, निमआराम, आराम100रुपये 4000/- / 8000 किमीपर्यंत
20पंढरपूर आषाढी/कार्तिकी एकादशीला शासकीय पुजेचे मान मिळांलेल्या एका वारकरी दाम्पत्यास फक्त एका वर्षासाठी मोफत प्रवास सवलतसाधी, निमआराम100रुपये 13470/-पर्यंत
21विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलतसाधी, निमआराम, आराम,वातानुकुलित,
शिवशाही (आसनी व शयनयान)
100 
22माजी विधान मंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलतसाधी, निमआराम, आराम,वातानुकुलित,
शिवशाही (आसनी व शयनयान)
100 
23रेसक्यू होममधील मुलांना वर्षातून एकदा सहलीकरितासाधी66.67 
24मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिक दृष्टया दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सहलीसाठीसाधी66.67 
25अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ति व त्यांचे साथीदारसाधी, निमआराम100रुपये 11000/-पर्यंत
26सिकलसेल रुग्णसाधी, निमआराम100प्रति प्रवास 150 किमीपर्यंत
 दुर्घर आजार (HIV)रुग्णसाधी, निमआराम100प्रति प्रवास 50 किमीपर्यंत
 डायलेसिस रुग्णसाधी, निमआराम100प्रति प्रवास 100 किमीपर्यंत
 हिमोफेलिया रुग्णसाधी, निमआराम100प्रति प्रवास 150 किमीपर्यंत
27राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तीसाधी, निमआराम,आराम100रुपये 2000/- अथवा 1000 किमीपर्यंत
28कौशल्य सेतू अभियान योजने अंतर्गत लाभार्थी ६ महिने पर्यंत कालावधी असणाऱ्या अभ्यासक्रमा करितासाधी66.67 
29शैक्षणिक खेळसाधी50 
30शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनासाधी, निमआराम,वातानुकुलित, शिवशाही (आसनी व शयनयान)100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *