शेतकऱ्यांसाठी सरकारने केले या जिल्ह्यात 318 कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप …

शेतकऱ्यांसाठी सरकारने केले या जिल्ह्यात 318 कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप .

 बँकेने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी ३ लाखापर्यंत अर्ध्या टक्के व्याज दराने पीककर्ज वाटप केलेले आहे. तसेच बँकेने सरासरी ७९ हजार ३५० पात्र शेतकऱ्यांना ३०४ कोटी रुपयांचे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ देखील दिला आहे.

दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज वाटपामध्ये आघाडी घेतली आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी बँकेने सरासरी २९८कोटी ३५ लाख  इतके कर्ज वाटप केले आहे. बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदम बांडे यांनी अशी माहिती दिली की, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एकूण सभासद शेतकऱ्यांना सरासरी २९८कोटी ३५ लाख इतके पीक कर्ज देण्यात आलेले आहे. तसेच यावर्षीच्या उद्दिष्ट पेक्षा १०६% इतके जास्त कर्ज वाटप केले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना मदत म्हणून तीन लाखा पर्यंत फक्त अर्धा टक्केच व्याजदरावर पीक कर्जाचे वाटप बँकेकडून केले जाते. तसेच बँकेने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजनेमार्फत ७९हजार ३५० इतक्या पात्र शेतकऱ्यांना ३०४ कोटी रुपये इतक्या कर्जमाफीचा लाभ दिला आहे.

शेतकर्‍यांना या जिल्ह्यात ३१८ कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप..

गेल्या वर्षी दोन्ही हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा शेतीमध्ये केलेला खर्च सुद्धा निघाला नाही, परंतु या सर्व संकटाचा सामना करून परत शेतकरी खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करू लागले आहेत. आता खरीप हंगामासाठी बियाणे, खते यासाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असते.  त्यामुळे शेतकरी आता पीक कर्जाकडे वळालेले आहेत. बुलढाणा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आत्तापर्यंत ३१८ कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केले आहे.

३१८ कोटी रुपयांचे वाटप, 30 हजार 109 शेतकऱ्यांना केले

चालू वर्षात व मागील वर्षात ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले असेल जर त्यांनी नूतनीकरण केलेले असेल तर अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून तीन टक्के व राज्य सरकारकडून चार टक्के व्याज 100% माफ होते. यामुळे व्याजाचा दर शेतकऱ्यांना 0 टक्के लागतो. या योजनेचा लाभ घ्यावा असे शेतकऱ्यांना बँकेकडून आव्हान करण्यात आलेले आहे .  बुलढाणा जिल्ह्यामधील यावर्षी खरीप हंगामासाठी एक लाख ५३ हजार शेतकऱ्यांना १४७० कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट मिळाले होते. त्यापैकी आत्तापर्यंत तीस हजार १०९ शेतकऱ्यांना ३१८ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झालेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *