लवकरच नवी कोरी पुस्तक शाळांमध्ये वितरित होणार, पाठ्यपुस्तकांना वह्यांची पान जोडून बालभारतीची पुस्तके तयार.

लवकरच नवी कोरी पुस्तक शाळांमध्ये वितरित होणार, पाठ्यपुस्तकांना वह्यांची पान जोडून बालभारतीची पुस्तके तयार

या शैक्षणिक वर्षांमध्ये पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडून तयार झालेली बालभारतीच्या पुस्तकांची नवीन झलक तुम्हाला पाहायला मिळणार आहे पाठ्यपुस्तकांना मागे वह्यांची पाने जोडून आता नवीन पुस्तके तयार झालेले आहेत व त्याचे वाटप लवकरच सुरू होणार आहे . 2023 – 2024 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता २री ते इयत्ता ८ वी यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडलेले असणार आहेत.

मुलांना आता वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळ्या नोटबुक बाळगण्याची गरज नाही.

यावर्षीचे शैक्षणिक शिक्षणासाठी बालभारतीने नव्या पद्धतीने पुस्तके तयार केलेले आहेत त्या पुस्तकांमध्ये धडे, घटक, कविता यांची विद्यार्थ्यांना नोंद करण्यात यावी, महत्त्वाचे पॉईंट लगेच लिहून ठेवण्यासाठी या वयांच्या पानांची जोडणी केलेली आहे. वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना विद्यार्थ्यांना त्या पानांवर लिहिता येणार आहे. विद्यार्थ्यांना आता प्रत्येक विषयासाठी वेगळी वही शाळेमध्ये नेण्याची गरज नाही शिक्षकांनी लिहिण्यासाठी दिलेल्या सर्व बाबी विद्याथ्यांना पाठ्यपुस्तकाला जोडलेल्या पानांवरच लिहून घ्यायच्या आहेत.

एका विषयाचे पुस्तक चार विभागांमध्ये विभागले जाईल.

यंदा विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्व विषयांची माहिती केवळ एका पुस्तकातून मिळणार आहे. त्यासोबतच एकाच विषयाची पुस्तक हे चार भागांमध्ये विभागलेले असणार आहेत. शाळा सुरू झाली की लगेच या पुस्तकांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे.

बुक डेपो मध्ये वाढीव दराने पुस्तके मिळण्याचा अंदाज वर्तवलेला आहे.

या पुस्तकांवर ‘विनामूल्य वितरणसाठी’ असे लिहिलेले असले तरी बुक डेपो मध्ये जेव्हा ही पुस्तके येतील तेव्हा यांच्या किमती वाढलेल्या असतील असा अंदाज वर्तवलेला आहे. पुस्तके महाग होत आहेत कारण ती तयार करण्यासाठी वापरला जाणारा कागदही महाग होत आहे. पुस्तकांच्या किमती या निश्चित करण्यात याव्या सदर पुस्तके ही चार भागात विभागणी करण्यात यावी अशी सूचना शिक्षक विभागाकडून देण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *