भारतामध्ये जमिनीला अजूनही गुंतवणुकीचे साधन मानले जाते. केवळ गुंतवणूकच नाही, तर आर्थिक स्थिरता आणि स्थिरतेचे लक्षण मानले जाते. त्यामुळे भारतातील खेड्यापाड्यात व शहरांमध्ये देखील सोन्यापेक्षा जास्त मान हा जमिनीला मिळतो.
त्यामुळे लोक गुंतवणूक करण्यासाठी जमीन खरेदी करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का कधी व्यक्ती किती जमीन खरेदी करू शकतो? यावर काही मर्यादा आहेत की नाही हे अनेकांना माहिती नाही?
जमीन खरेदी बाबत प्रत्येक राज्याचे वेगवेगळे नियम आहेत .बहुतांश राज्यांमध्ये यावर मर्यादा घालण्यात आलेली आहे. मात्र बिगर शेती जमिनी बाबत असा कोणता नियम दिसत नाही म्हणजेच हरियाणा मध्ये तुम्ही कितीही बिगर शेती योग्य जमीन खरेदी करू शकता पण इथे लागवड योग्य जमिनी बद्दल सांगत आहोत.
काही राज्य आणि जमीन खरेदी मर्यादा
केरळ मधील जमीन दुरुस्ती कायदा 1963 अंतर्गत विवाहित नसलेली व्यक्ती 7.5 एकर पर्यंत जमीन खरेदी करू शकते.
तसेच पाच सदस्यांची कुटुंब 15 एकर जमीन खरेदी करू शकतात.
महाराष्ट्रातील लागवड योग्य जमीन ही ज्याची आधीच शेती आहे .तेच विकत घेतील याची कमाल मर्यादा 54 एकर आहे.
पश्चिम बंगालमध्ये जास्तीत जास्त 24.5 एकर जमीन खरेदी करता येते.
हिमाचल प्रदेश मध्ये 32 एकर जमीन खरेदी करता येते .
तसेच कर्नाटकातही 54 एकर जमीन खरेदी करू शकतो इथे महाराष्ट्राचा नियम लागू होत आहे .
उत्तर प्रदेश मध्ये एक व्यक्ती जास्तीत जास्त 12.5 एकर लागवड योग्य जमीन खरेदी करू शकते.
बिहारमध्ये 15 एकर पर्यंत शेती किंवा बिगर शेती जमीन खरेदी करता येते.
अनिवासी भारतीय किंवा परदेशी नागरिक भारतात शेती योग्य जमीन खरेदी करू शकत नाही .त्याला फार्म हाऊस किंवा वृक्षारोपण मालमत्ता ही खरेदी करता येत नाही .मात्र कोणाला वारसा हक्काने जमीन द्यायची असेल तरच ते देऊ शकतात.