Rabi seed sales : १७ सप्टेंबरपासून रबी बियाणे विक्री सुरू परभणी विद्यापीठाची शेतकऱ्यांसाठी खास योजना..

Rabi seed sales : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात १७ सप्टेंबरपासून रबी हंगामासाठी विकसित केलेल्या दर्जेदार बियाण्यांची विक्री सुरू होत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ रबी पीक परिसंवादाच्या उद्घाटन सोहळ्यात होणार असून, शेतकऱ्यांना विविध वाणांचे बियाणे मर्यादित दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यापीठाने यंदा हरभरा, ज्वारी, करडई, गहू आणि जवस या […]
Heavy rain : जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाचं थैमान, शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान..

Heavy rain : मागील दोन दिवसांपासून जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. विशेषतः बदनापूर, अंबड, घनसावंगी आणि जालना तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन, कपाशी, मका आणि तूर पिकांवर पावसाचा जोरदार फटका बसला असून अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे पिकं सडण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक नाल्यांना पूर […]
Onion market : नाफेड कांदा खरेदीवर मोठा खुलासा, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती..

Onion rate : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाफेडकडून महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या बफर स्टॉकसाठी कांदा खरेदीसंदर्भात नाफेड आणि एनसीसीएफने ३ लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, सध्या ही प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली असून, पुढील टप्प्याची वाट पाहिली जात आहे. नाफेडचे नाशिक विभाग व्यवस्थापक आर. एम. पटनाईक यांनी स्पष्ट केले की, […]