indigenous cows : गोशाळांना ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत , देशी गायींच्या संगोपनासाठी अनुदानाची संधी !

राज्यातील नोंदणीकृत गोशाळा, गोसदन, पांजरपोळ आणि गोरक्षण संस्थांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशी गायींच्या पालन-पोषणासाठी राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र गोशाळांनी अंतिम तारखेची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत […]
Rabi season : रब्बी हंगामासाठी महाडीबीटीवर योजनांचा लाभ , शेतकऱ्यांनी अर्ज प्रक्रियेकडे लक्ष द्यावे !

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी प्रणाली महत्त्वाची ठरत आहे. कृषी विभागाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज, घटकांची निवड आणि अर्जाची स्थिती तपासण्याची सुविधा महाडीबीटीच्या माध्यमातून उपलब्ध आहे. मात्र, सध्या महाडीबीटी 1.0 वर 10 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत नवीन अर्ज स्वीकारले जाणार नसून नवीन अर्जांसाठी महाडीबीटी 2.0 पोर्टलचा […]