Methods for chickpeas : हरभऱ्याची उशिरा पेरणी , वाण आणि लागवड पद्धतीत चुका टाळा !

रब्बी हंगामातील महत्त्वाचे कडधान्य पीक म्हणून हरभऱ्याला शेतकऱ्यांकडून मोठी पसंती दिली जाते. कमी पाण्यात चांगले उत्पादन देण्याची क्षमता, जमिनीची सुपीकता वाढविण्यास होणारी मदत आणि बाजारपेठेत मिळणारी मागणी यामुळे हरभरा हे शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक मानले जाते. मात्र, यंदा काही भागांत पावसामुळे खरीप पिकांची काढणी उशिरा झाल्याने हरभऱ्याची पेरणी नियोजित वेळेपेक्षा पुढे ढकलली जात आहे. अशा […]
Sowing wheat late : उशिरा गहू पेरणी करताय? योग्य वाण , बियाणे व खत व्यवस्थापनातून वाढवा उत्पादन !

रब्बी हंगामात गव्हाची पेरणी वेळेवर होणे हे चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाचे मानले जाते. मात्र पावसाचा लांबलेला कालावधी, शेतातील ओलाव्याची स्थिती, खरीप पिकांची उशिरा झालेली काढणी किंवा मशागतीसाठी लागणारा वेळ यामुळे अनेक शेतकऱ्यांना गव्हाची पेरणी उशिरा करावी लागते. अशा परिस्थितीत पेरणीला विलंब झाला म्हणून उत्पादनात मोठी घट होईल, अशी भीती बाळगण्याची गरज नाही. योग्य वाणाची निवड, बियाण्याचे […]