बासमती तांदळावरील MEP कमी केला, निर्यात वाढली; दरात १० टक्के वाढ होण्याची शक्यता,वाचा सविस्तर ..

गेल्या आठवड्यामध्ये भारताने बासमती तांदळाची किमान निर्यात किंमत (MEP)  १२०० डॉलर प्रति टन वरून 950 डॉलरपर्यंत कमी केल्यानंतर तुर्कस्तान मधील अनेक मोठे खरेदीदार तांदूळ खरेदी करण्यासाठी भारतात आले आहेत.  परिणामी निर्यात बाजार किंमतीमध्ये 975 हजार डॉलर प्रति टन पर्यंत वाढले आहेत . हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना आता त्यांच्या बसमती भात पिकासाठी प्रतिक्विंटल ३९०० रुपये मिळत आहेत.

जागतिक बाजारपेठेतील मोठ्या मागणीमुळे एका आठवड्यात 700 रुपये प्रति क्विंटल ची वाढ झाली आहे.  आतापासून एका महिन्यामध्ये किमती आणखीन दहा टक्के वाढतील अशी अपेक्षा आहे.बासमती तांदळाच्या एकूण 1.7 मिलियन हेक्टर क्षेत्रापैकी पंधराशे नऊ जातीचा वाटा सुमारे 40% आहे . 2022 –  23 मध्ये बासमती तांदळाची निर्यात 4.5 मिलियन होती . याचे मूल्य 38 524.11 कोटी रुपये होते . आखाती देश हे प्रमुख खजिनदार होते.  भारतात उत्पादित बासमती तांदळाच्या 80 टक्के पेक्षा जास्त निर्यात केली जाते.

प्रति टन बाराशे डॉलरच्या खाली असलेल्या किमतीमुळे जुने करार रद्द करण्यात आले होते . बासमती निर्यात दराने ऑल इंडिया प्राईस एक्सपोर्ट्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष विजय सेटिया म्हणाले की, नवीन ऑर्डर येत आहेत आणि तुर्कस्तान मधून मोठे खरेदीदार बासमती तांदूळ चांगल्या प्रमाणात घेण्यासाठी भारतात येत आहेत.

सोयाबीन:

सोयाबीनच्या बाजारात सुधारणा झाली.आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात  सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये चांगली सुधारणा झाली होती.  जवळपास दोन टक्क्यांनी सोयाबीनचे वायदे वाढून १३.५३ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते.

तर  साडेचार टक्क्यांनी ४४४ डाॅलर प्रतिटनांवर सोयापेंडचे वायदेही बंद झाले होते. सोयाबीनच्या भावात क्विंटलमागं देशातील बाजारात  १०० रुपयांची सुधारणा दिसून आली होती.  प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान सोयाबीनची सरासरी भावपातळी होती. सोयाबीनच्या भावात बाजारातील स्थिती पाहता आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस:

कापसाच्या वायद्यांमध्ये काहिशी घट होत बाजार नरमाईने बंद झाला होता.  ८० सेंटवर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे बंद झाले होते. तर २२० रुपयांनी देशातील वायदेही कमी होऊन ५८ हजार ४०० रुपये प्रतिखंडीवर बंद झाले होते. कापसाचे भाव बाजार समित्यांमध्येही  दबावातच दिसत आहेत.

कापसाची आवक सध्या बाजारात  उद्योगांना आवश्यक त्या पातळीवर होत आहे. तर मागील हंगामातील कापसाचाही वापर सध्या होत आहे. तर उद्योगांकडून कापड निर्यातील मागणी नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कापसाचे भाव दबावात आहेत. आणखी काही दिवस ही स्थिती राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांदा : 

बाजारात  कांद्याच्या भावातील नरमाई कायम आहे. बाजारात कांदा आवकही गेल्या आठवड्याच्या तुलनेत काहिशी जास्त दिसते.कांद्याचे किमान निर्यातमूल्य केंद्र सरकारने दप्पट करून ८०० डाॅलर प्रतिटन केले. किमान निर्यात मुल्यात वाढ केल्याचा दबाव बाजारावर दिसून आला. 

 आज सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजारांचा कांद्याला भाव मिळाला. पण अभ्यासकांच्या मते , कांद्याचे भाव जास्त दिवस दबावात राहणार नाहीत, कारण सध्या देशात कांद्याचा पुरवठा कमी आहे. तसेच कांद्याची टंचाई पुढील दीड ते दोन महिने कायम राहण्याची शक्यता आहे. कांद्याचे भावही त्यामुळे तेजीतच राहतील, असा अभ्यासकांनी अंदाज व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *