मनरेगाच्या माध्यमातून,विहिरीसाठी ४ लाखाचे अनुदान अर्ज कसा व कुठे करायचा ? वाचा सविस्तर .

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून  मनरेगाच्या माध्यमातून अनेक कामे केली जात आहेत.  सिंचन विहिर खोदण्यासाठी चार लाख रुपयांचं अनुदान आता  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे.याबाबतचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे.  या योजनेचा  कुणा कुणाला लाभ मिळू शकतो? लाभ मिळण्यासाठी कोणत्या कागदपत्राची आवश्यक असते? हे समजून घेऊयात. 

अलीकडेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये बदल करण्यात आले असून त्यात वैयक्तिक लाभावर भर देण्यात आला आहे. या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे योजनेच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंबाला लाभ मिळाला पाहिजे . त्यानुसार  राज्यात अजून तीन लाख 87 हजार 500 विहिरी खोदणे भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे शक्य आहे.  या विहिरी लवकरात लवकर मनरेगाअंतर्गत खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याचा किपायतीशीर वापर  केलागेल्यास अनेक कुटुंबांना याचा फायदा होऊ शकतो. यास उद्देशातून मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहिरीचे काम सुरू करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर लाभार्थी कुटुंबास तब्बल चार लाख रुपयांचा अनुदान दिले जाणार आहे.

इथं पहा काय काय आवश्यक? 

या योजनेच्या लाभार्थ्यांच्या निवडीसाठी शासन निर्णयानुसार निकष ठरविण्यात आले आहेत.  त्यानुसार लाभधारक हा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा भटक्या जमाती विमुक्त जाती दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी करता असलेली, कुटुंब सीमांत शेतकरी 2.5 (एकर पर्यंत जमीन असलेले) अल्पभूधारक शेतकरी (पाच एकर पर्यंत शेत जमीन असलेले) या निकषांवर निवड केली जाईल. तर पात्रतेसाठी अर्जदाराकडे एक एकर शेत जमीन सलग असावी.  पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून 500 मीटर पेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर खोदता येईल.  दोन विहिरींमध्ये दीडशे मीटर अंतराची अट अनुसूचित जाती जमाती दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासाठी लागू नाही.  तसेच खाजगी विहिरीपासून दीडशे मीटर अंतराची अट लागू राहणार नाही . लाभ धारकांच्या सातबारावर याआधीच विहिरीची नोंद नसावी . एकूण क्षेत्राचा दाखला म्हणजे उतारा असावा . एकापेक्षा जास्त शेतकरी विहीर घेऊ शकतील एकूण जमिनीची सलग क्षेत्र एक एकर पेक्षा जास्त असावी महत्वाचं म्हणजे अर्जदार हा जॉब कार्ड धारक असला पाहिजे.

अर्ज कसा व कोठे करायचा ? 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे.  त्यासाठी मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीसाठी संबंधित ग्रामपंचायतीकडे अर्ज करायचा आहे, म्हणजे शासनाने जारी केलेल्या जीआर सोबत एक अर्जाचा नमुना देण्यात आला आहे.  हा नमुना सध्या कागदावर लिहून तुम्ही अर्ज करू शकता.

तसेच अर्जासोबत
◼️ संमतीपत्र सुद्धा द्यायचे आहे.
◼️ यासाठी अर्जासोबत सातबाराचा ऑनलाईन उतारा, 8-अ चा ऑनलाईन उतारा,
◼️ मनरेगा जॉब कार्डची प्रत, सामुदायिक विहीर घ्यायची असल्यास सर्व जण मिळून 40 गुंठे जमीन सलग असल्याचा पंचनामा आणि समोपचारानं पाणी वापराबाबतचं सर्वांचं करारपत्र जोडावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *