लाडकी बहीण व लाडका भाऊ या योजने नंतर आता आपला अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याच्या लाभाच्या सर्व योजना राबवून लाडका शेतकरी अभियान राज्यात सुरु करण्याबरोबर सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये मदत देण्यातील ई पिक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केली.
सातबारावर नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात केली. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द करण्यात आली आहे.
खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये शेतक-यांना दिलासा देण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किंमतीतील घसरणीमुळे शेतक-यांना नुकसान सोसावे लागले, शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतक-याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येत आहे.
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक कसे करायचे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
१. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करण्यासाठी सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट लिंकवर क्लिक करावे ,व ओपन करावी .
२. https://scagridbt.mahait.org/
३. सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट ओपन केल्यानंतर “Disbursement Status” या ऑपशनवर क्लिक करा.
४. पुढे Disbursement Status पेज मध्ये आधार नंबर व कॅप्चा कोड टाकून Get Aadhaar OTP वर क्लिक करावे .
५. त्यानंतर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याचे स्टेट्स विषयीची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळेल.