
Ujni Dam : राज्यात ७ मे २०२५ रोजीपर्यंत सर्व धरणांमध्ये मिळून एकूण ३२.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, यातील उपयुक्त पाणीसाठा २७.१८ टक्के आहे. मागील वर्षी याच दिवशी उपयुक्त साठा २८.८५ टक्के होता. यंदा साठा किंचित वाढलेला असला तरी विभागनिहाय तफावत मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.
मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूण साठा ३०.७७ टक्के असून उपयुक्त साठा २५.६४ टक्के आहे. मध्यम प्रकल्पांत ३९.४७ टक्के, तर लघुप्रकल्पांत ३३.६० टक्के उपयुक्त जलसाठा आहे. दरम्यान उजनी धरणातील पाणीसाठा शून्याच्या खाली असून मृतजलसाठा हा २३ टक्के इतका शिल्लक आहे, मागच्या वर्षी तो सुमारे २१ टक्के इतका होता.
राज्यभरात कोकण आणि अमरावती विभाग वगळता इतर भागांतील धरणांमध्ये पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. विशेषतः मराठवाड्यातील काही धरणांत उपयुक्त साठा १० टक्क्यांच्या खाली आहे. पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठा आणि शेतीचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करावे लागणार आहे.
विभागनिहाय सर्वाधिक साठा कोकण विभागात असून येथे ४०.३० टक्के साठा शिल्लक आहे (उपयुक्त ३३.५८%), मात्र मागील वर्षी तुलनेत तो कमी झाला आहे. अमरावती विभागात ४३.१३ टक्के, नाशिकमध्ये ३६.४२%, नागपूरमध्ये ३५.१०%, पुण्यात २५.८३% आणि सर्वात कमी साठा छत्रपती संभाजीनगर विभागात ३१.३८ टक्के आहे.
महत्त्वाच्या धरणांतील साठा पुढीलप्रमाणे आहे:
गोसीखुर्द: १८.३५% (उपयुक्त १३५.८५ द.ल.घ.मी), मागील वर्षी ३४.१२%
काटेपूर्ण: २२.६५% (उपयुक्त १९.५६ द.ल.घ.मी)
पैठण (जायकवाडी): ३६.२८% (उपयुक्त ७८७.६८ द.ल.घ.मी), मागील वर्षी ७.३९%
विष्णुपुरी: ५०.५७% (उपयुक्त १०९.६८ द.ल.घ.मी)
माजलगाव: ७.७४% (उपयुक्त २४.१० द.ल.घ.मी)
भंडारदरा: ५६.२८%
नीळवंडे: १८.९७%
गंगापूर: ४७.०१%
गिरणा: २८.३९%
दारणा: ३५.५२%
राधानगरी: ४४.५१%
खडकवासला: ४१.०१%
पवना: २७.८५%
पानशेत: २५.०५%
नीरा देवघर: २०.२०%
वारणा: ३२.०२%
कोयना: २६.४३%
वीर: ३९.५२%