किडी मोहर किंवा फळातील रस शोषून घेतात. तसेच त्यांची लाळ ही फायटोटॉक्सिक असल्याने पालवी/मोहर सुकून जातो, मोहराच्या दांड्यावर काळे डाग दिसून येतात.
काजू
फुलोरा ते फळधारणा अवस्था
फुलकिडे
या अवस्थेतील काजूवर फुलकिडींचा (थ्रीप्स) प्रादुर्भाव दिसून येतो. फुलकिडे व तिची पिले कोवळी पालवी, मोहराचा देठ, कोवळ्या बिया व बोंडूवरील साल खरवडतात. त्या ठिकाणी भुरकट रंगाचे चट्टे पडतात. बियांची गळ होते. या किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन* (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. किंवा ॲसिटामिप्रीड* (२० टक्के एसपी) ०.५ ग्रॅम.
प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास, दुसरी फवारणी लगेचच ८ ते ९ दिवसांनी कीटकनाशक बदलून करावी.
(टीप : किडीचा संपूर्ण जीवनक्रम १५ दिवसांमध्ये पूर्ण होतो. त्यामुळे या किडीच्या नियंत्रणासाठी दुसरी फवारणी लगेचच घेणे आवश्यक असते.)
(*लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारस आहे.)
रसशोषक किडी ः
फुलोरा ते फळधारणा अवस्थेतील काजूवर मावा आणि ढेकण्या (टी मोस्किटो बग) किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडी मोहर किंवा फळातील रस शोषून घेतात. तसेच त्यांची लाळ ही फायटोटॉक्सिक असल्याने पालवी/मोहर सुकून जातो, मोहराच्या दांड्यावर काळे डाग दिसून येतात. फळांची गळ दिसून येते. मावा कीड शरीरातून मधासारखा गोड पदार्थ बाहेर टाकते. त्याकडे मुंग्या आकर्षित होतात.
या किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
मोहर फुटण्याच्यावेळी, प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १ मि.लि.
फळधारणेच्या वेळी, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. किंवा ॲसिटामिप्रीड (२० टक्के एसपी) ०.५ ग्रॅम.
फवारणी पानांच्या खालून आणि वरून व्यवस्थित बसेल अशी शक्यतो सकाळी १० पूर्वी किंवा संध्याकाळी ४ नंतर करावी. (टीप : कीटकनाशकास लेबल क्लेम नाहीत, ॲग्रेस्को शिफारस.). एकाच कीटकनाशकाची सलग फवारणी घेणे टाळावे.
बोंड आणि बी पोखरणारी अळी ः
फळधारणा अवस्थेतील काजूवर बोंड आणि बी पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. या किडीची अळी बी व बोंडावरील भाग खरवडून त्यावर आपली उपजीविका करते.
त्यानंतर अळी बी व बोंडामध्ये प्रवेश करून आपला प्रवेश मार्ग विष्ठेच्या साह्याने बंद करते. अळीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
खोडकीड ः
काजू झाडावर खोडकिडीचा प्रादुर्भाव खोड आणि उघडी मुळे यावर दिसून येतो. किडीच्या प्रादुर्भावासाठी खोडाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. खोडकीड झाडाची साल पोखरून आतील गाभा खाते. खोडाला पडलेल्या छिद्रातून भुसा बाहेर पडलेला दिसतो. खोडातून भुस्सा येताना दिसल्यास त्वरित नियंत्रणाचे उपाय करावे.
प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी खोडाची प्रादुर्भावित साल काढून तारेच्या हुकाने कीड बाहेर काढून मारून टाकावी. क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) १० मि.लि. किंवा फिप्रोनील ५ मि.लि. प्रति लिटर पाण्यामध्ये (५ लिटर द्रावण प्रति झाड) या प्रमाणात घेऊन झाडाच्या बुंध्यालगतचा भाग द्रावणाने चांगला भिजवावा.
झाडाला कोणत्याही प्रकारे इजा करू नये. इजा झाल्यास त्याला बोर्डो पेस्ट लावून जखम झाकावी.
झाडाची मुळे उघडी राहणार नाही याची नेहमी काळजी घ्यावी.
नियमित झाडाचा खोडालगतचा भाग स्वच्छ ठेवावा.
वाळलेल्या फांद्या कापलेल्या भागावर डांबर लावावे. यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
सिंचन व अन्य व्यवस्थापन ः
फळधारणा झालेल्या काजू झाडांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने पाणी संध्याकाळी किंवा सकाळी द्यावे.
नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना पहिली २ ते ३ वर्षे ८ दिवसांच्या अंतराने १५ लिटर पाणी प्रति कलम द्यावे.
झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.
कलिंगड ः
फळधारणा
कलिंगडाच्या फळांचे सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी फळे भाताच्या पेंढ्याने किंवा गवताने झाकून घ्यावीत. कलिंगड पिकामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असल्याने फळमाशीच्या नियंत्रणासाठी पिकामध्ये प्रति एकरी दोन ‘क्यू ल्युअर’ रक्षक सापळे लावावेत. वेळोवेळी कीडग्रस्त फळे गोळा करून नष्ट करावीत.
फळधारणा अवस्थेतील कलिंगड पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. गरजेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी. फळे काढणीपूर्वी आठवडाभर अगोदर पिकास देणे बंद करावे.
ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन करताना ९० दिवसांच्या पिकाच्या कालावधीकरीता एकूण ९ हप्त्यांमध्ये खत व्यवस्थापन करावे. पेरणीनंतर १५ दिवसांने ठिबक सिंचनाद्वारे खते देण्यास सुरुवात करावी.
खत व्यवस्थापन
पीक अवस्था एकूण हफ्ते खत मात्रा (प्रती एकर प्रती हप्ता)
०० ०० १९:१९:१९ युरिया ०:०:५०
सुरुवातीचा कालावधी ३ १२ किलो १९ किलो ४ किलो
वाढीची अवस्था ३ १२ किलो १९ किलो ४ किलो
फळधारणा ३ १२ किलो १९ किलो ५ किलो
(वरील प्रमाणे एक आठवड्याच्या अंतराने खत व्यवस्थापन करावे.)
कडधान्य पिके- शेंगा अवस्था.
वाल, चवळी, मूग यांच्या पक्व शेंगा उन्हामुळे तडकून नुकसान होते. ते कमी करण्यासाठी जसजशा शेंगा वाळतील तसतशी शेंगांची तोडणी सकाळच्या वेळी करावी. शेंगा उन्हात ४ ते ५ दिवस वाळवून मळणी करावी.
वाल, चवळी पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पाणी देण्याची व्यवस्था करावी.
रब्बी पीक काढणीनंतर जमिनीतील कीड व रोगकारक बुरशींच्या सुप्तावस्था नष्ट करण्यासाठी जमिनीची वाफसा स्थितीत नांगरणी करून उन्हात तापून द्यावी.
उन्हाळी भात फुटवे अवस्था.
भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी.पर्यंत नियंत्रित करावी.
भात पीक फुटवे येण्याच्या अवस्थेत नत्र खताची दुसरी मात्रा (युरिया ८७५ ग्रॅम) प्रति गुंठा देण्यात यावी.
कडधान्य पिके शेंगा अवस्था.
वाल, चवळी, मूग यांच्या पक्व शेंगा उन्हामुळे तडकून नुकसान होते. ते कमी करण्यासाठी जसजशा शेंगा वाळतील तसतशी शेंगांची तोडणी सकाळच्या वेळी करावी. शेंगा उन्हात ४ ते ५ दिवस वाळवून मळणी करावी.
वाल, चवळी पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पाणी देण्याची व्यवस्था करावी.
रब्बी पीक काढणीनंतर जमिनीतील कीड व रोगकारक बुरशींच्या सुप्तावस्था नष्ट करण्यासाठी जमिनीची वाफसा स्थितीत नांगरणी करून उन्हात तापून द्यावी.
source-agrowon