देशातील बहुसंख्य लोक अजूनही शेतीतून आपला उदरनिर्वाह करत आहे. देशाच्या जीडीपीमध्ये (GDP) कृषीचे योगदान 17 ते 18 टक्के आहे.
भारत हा प्राचीन काळापासून कृषीप्रधान देश मानला जातो. देशातील बहुसंख्य लोक अजूनही शेतीतून आपला उदरनिर्वाह करत आहे. देशाच्या जीडीपीमध्ये (GDP) कृषीचे योगदान 17 ते 18 टक्के आहे. अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध योजना आणत असते. त्यापैकी एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड आहे. शेतीचे उत्पादन अनेक गोष्टींवर अवलंबून असते, त्यात हवामान महत्त्वाचे असते.
बऱ्याचदा वादळ, अतिवृष्टीमुळे आलेला पूर इत्यादीमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना अनेकदा कर्ज घ्यावे लागते. शेतकरीअनेकदा त्याच्या आजूबाजूच्या लोकांकडून खूप जास्त व्याजदराने कर्ज घेतात. यानंतर आयुष्यभर त्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड सुरू केले आहे. किसान क्रेडिट कार्ड योजना 1998 मध्ये सुरू झाली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज मिळण्याची तरतूद आहे. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
किसान क्रेडिट कार्डचे फायदे…
किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना कमी व्याजदराने 3 लाखांपर्यंत कर्ज देते. हे कर्ज केवळ 4 टक्के व्याजदराने दिले जाते. या कार्डचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच, जास्तीत जास्त 75 वर्षांचे शेतकरी या क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतात.
किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे…
– मतदार ओळखपत्र
– आधार कार्ड
– ड्राइव्हिंग लायसन्स
– पासपोर्ट
– शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे
किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची पद्धत…
किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज करू शकता. बँकेत गेल्यानंतर किसान क्रेडिट कार्डचा अर्ज भरा. यानंतर तुम्हाला वर दिलेली सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील. यानंतर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळेल. याशिवाय, तुम्ही बँकांच्या अधिकृत वेबसाइटद्वारेकिसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकता.
source:- lokmat