शेतीपंपाच्या जोडणीसाठी एप्रिल २०१८ पासून मार्च २०२२ पर्यंत ६९ हजार ९८३ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. ह्या जोडण्या देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘कृषी धोरण-२०२०’ आणले.
वीज यंत्रणेपासून जोडणीचे (Electricity Connection) ठिकाण ३० मीटरपर्यंत असलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करून कोटेशन भरावे, अशा सर्व शेतकऱ्यांना ३१ मार्चच्या आत वीज जोडणी द्यावेत, असे निर्देश मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी महावितरणच्या परिमंडलातील अभियंत्यांना दिले आहेत.
पावडे म्हणाले, ‘‘शेतीपंपाच्या जोडणीसाठी एप्रिल २०१८ पासून मार्च २०२२ पर्यंत ६९ हजार ९८३ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. ह्या जोडण्या देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘कृषी धोरण-२०२०’ आणले.
या धोरणानुसार दोन वर्षांत जी वसुली झाली, त्यातील ३३ टक्के ‘कृषी आकस्मिक निधी’ गावपातळीवर व ३३ टक्के निधी जिल्हा पातळीवर उपलब्ध झाला.
त्यातून प्रलंबित जोडण्या देणे व वीज यंत्रणा सक्षमीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले. अंतरानुसार प्रलंबित जोडण्याची संख्या पाहिली असता ३० मीटरच्या आतील ५० हजार ३१३ जोडण्यांपैकी ५० हजार ८९ जोडण्या दिल्या आहेत.’’
३१ ते २०० मीटर अंतरातील १२ हजार १६० पैकी ९२६२ तर २०१ ते ६०० मीटरपर्यंतच्या ७५१० पैकी २३२४ जोडण्या दिल्या आहेत. याशिवाय ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या ११९ शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे वीज जोडणी देण्याचे काम महावितरण बारामती परिमंडलाने केले आहे. तसेच उर्वरित जोडण्या देण्याचे कामही युद्धपातळीवर सुरु आहे, असेही पावडे म्हणाले.
नजीकच्या शाखा कार्यालयात करा अर्ज…
‘‘ज्या शेतकऱ्यांची ३० मीटर अंतरातील जोडणी प्रलंबित आहे किंवा ज्यांना नव्याने अर्ज करायचा असेल. त्यांनी नजीकच्या महावितरण शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा, या सर्व शेतकऱ्यांना तातडीने नवीन जोडण्या देण्यात येतील’’, असेही पावडे म्हणाले.
source:- agrowon