परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एक एप्रिल 2023 रोजी एक हवामान अंदाज वर्तवला होता. एक एप्रिलला म्हणजेच शनिवारी डखं यांनी राज्यात सहा एप्रिलपासून पाऊस सुरू होईल असा अंदाज बांधला होता. झालं देखील तसंच राज्यात 6 एप्रिल पासून जोरदार पाऊस सुरू आहे. काल परवापर्यंत आता कुठे हवामान निवळेल असे चित्र तयार झाले होते. मात्र काल पुणे, अहमदनगर, नाशिक आणि सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली.दरम्यान भारतीय हवामान विभागाने उद्यापासून हवामान प्रामुख्याने कोरडे राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच उद्यापासून तापमानात वाढ होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. मात्र भारतीय हवामान विभागाच्या अंदाजा व्यतिरिक्त डख यांनी एक वेगळा अंदाज यावेळी वर्तवला आहे. डख यांनी राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे.
18, 19 आणि 20 एप्रिल रोजी राज्यात पाऊस पडेल असा डख यांचा अंदाज आहे. दरम्यान गेल्या महिन्यात आणि या महिन्याच्या सुरुवातीला वर्तवलेला हवामान अंदाज डख यांचा तंतोतंत खरा ठरला असल्याने हा देखील अंदाज जर खरा ठरला तर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान या ठिकाणी होणार आहे. आधीच अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
अशातच राज्यात आणखी काही दिवस पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढणार आहे. विशेष बाब म्हणजे पुढील मे महिन्यात देखील राज्यात पावसाची शक्यता आहे. पुढल्या महिन्यात पहिल्या आठवड्याच्या शेवटी आणि 15 मे नंतर राज्यात पाऊस पडेल असा अंदाज डख यांचा आहे. एकंदरीत सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
निश्चितच ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. मात्र येणारा पावसाळा हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो असा देखील अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. वास्तविक, येणाऱ्यां मान्सून काळात कमी पर्जन्यमान राहील असा अंदाज स्कायमेट आणि अमेरिकन हवामान विभागाने व्यक्त केला आहे. म्हणजे या दोन्ही हवामान संस्थांनी यंदा भारतात दुष्काळाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
पण यावर्षी देखील गेल्या वर्षी प्रमाणे चांगला पाऊस पडेल असे मत डख यांनी व्यक्त केले आहे. यामुळे ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब राहणार आहे. डखं यांनी यंदाच्या मान्सून बाबत दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी आठ जुलैला मान्सूनचे आगमन होईल आणि 22 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडेल. तसेच जून अखेरपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या आटपल्या जातील असे त्यांनी सांगितले आहे.
source:- agromarathi