‘या’ पिकाची शेती करा अन् मालामाल व्हा! भारतात दिवसेंदिवस वाढतेय मागणी

Beneficial Crop: संपूर्ण जगातून भारतात बऱ्याच गोष्टी निर्यात केल्या जातात. शेतकरी शेतातील पिकांचा योग्य मोबदला मिळावा या दृष्टीने हल्ली वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात. तेव्हा शेतकऱ्यांनी १०० टक्के फायदा करून देणारी पिके शेतात लावली तर नक्कीच फायदा होईल. आज आपण अशा पिकाबाबत जाणून घेणार आहोत ज्याने तुम्हाला फायदाच फायदा होईल.

बटाट्यासारखा दिसणारा रताळा भारतासह जगभर आवडतो. तसे पाहता, रताळे निर्यातदारांच्या यादीत जगभरात भारत सहाव्या क्रमांकावर आहे. तसेच भारतात या पिकाच्या उत्पन्नवाढीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत. तेव्हा लवकरच भारत चीनला मागे टाकून निर्यातदारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर यायला जास्त वेळ लागणार नाही. (Farmer)

भारतातील अनेक राज्यांमध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असून शेतकरी या पिकातून मोठा नफाही कमावत आहेत. आज या लेखात आम्‍ही तुम्‍हाला रताळ्याची लागवड करून सामान्य पिकांपेक्षा अधिक पैसे कसे कमावता येईल ते सांगणार आहोत.

रताळ्याची लागवड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या शेतातील मातीचा प्रकार ओळखावा लागेल. जर तुमच्या जमिनीची माती खूप कठीण आणि खडकाळ असेल किंवा तुमच्या शेतात पाणी साचण्याची समस्या असेल तर रताळ्याची लागवड करणे तुमच्यासाठी योग्य नाही.

 

जर तुमच्या शेतातील मातीचे pH मूल्य 5.8 ते 6.8 दरम्यान असेल तर तुम्ही रताळ्याची लागवड अगदी आरामात करू शकता. रताळ्याची लागवड करताना सिंचनाची खूप काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही उन्हाळ्यात त्याची रोपे लावली असतील, तर लावणीनंतर लगेच पाणी देऊ नये. आठवड्यातून एकदाच पाणी देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही पावसाळ्यात रताळ्याची लागवड केली असेल, तर सिंचनाची गरज भासणार नाही.

रताळ्याच्या शेतीसाठी कोणत्या प्रकारचे खत वापरावे?

आजच्या काळात तुम्ही कोणतेही पीक घेत असाल तर तुम्ही तुमच्या शेतात कोणते खत कधी वापरले यावरही तुमच्या पिकाचे उत्पन्न अवलंबून असते. जर तुम्ही रताळ्याचे पीक घेत असाल तर तुम्ही तुमच्या शेतात नायट्रोजन, फॉस्फर आणि पोटॅशचा वापर करावा.

जर माती जास्त आम्लयुक्त असेल, तर तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट आणि बोरॉन वापरावे. तुम्ही तुमच्या जमिनीनुसार या खतांची मात्रा कृषी तज्ज्ञांना विचारून निवडू शकता.

सरासरी उत्पन्न काय असेल?

शेवटी ते जे पीक घेतात त्यात त्यांचे उत्पादन काय असेल आणि त्यांना त्यांच्या खर्चानुसार नफा मिळेल का, हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. रताळ्याबद्दल बोलायचे झाले तर यात शेतकरी जास्त नफा मिळवतो. एका हेक्टरमध्ये सुमारे 25 टन रताळ्याचे उत्पादन होते. 10 रुपये किलोने जरी ठेवली तरी शेतकऱ्याला एक एकरातून किमान 1.25 लाख रुपये मिळतील.

source:- esakal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *