शेतकऱ्यांनो अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय? त्वरित करा ‘हे’ काम, तरचं मिळेल भरपाई

सध्या उन्हाळा ऋतू सुरू आहे. परंतु अवकाळी पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे (Crop Insurance) मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी (Crop Insurance) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी प्राथमिक जबाबदारी म्हणून काय केले पाहिजे ही माहिती जाणून घेऊयात. जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल.

भरपाईसाठी नुकसानग्रस्तांनी काय करावे?
विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे नंबर नुसार बाधीत शेती पीक (Crop Insurance) व बाधीत क्षेत्र बाबत नुकासनीची घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत आपण जिल्हानिहाय पिक विमा कंपनीला टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर फक्त एक कॉल करुन तक्रार नोंदवू शकता. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक आहे.

…तरचं मिळेल नुकसान भरपाई
जर शेतकरी मित्रांनो तुम्ही पीक विमा कढेल्ला नसेल तर तात्काळ ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि तलाठी यांना लेखी अर्ज करावा. तसेच आपल्या नुकसान झालेल्या पिकाची पाहणी त्यांच्याकडून करून घ्यावी. 72 तासाच्या आत ही प्रक्रिया होणे आवश्यक आहे. तरचं शेतकरी नुकसान भरपाईसाही पात्र ठरून त्यांना ही मदत लवकरच मिळेल.

शेतकऱ्यांनी खालील जिल्हानिहाय टोल फ्रि क्रमाकावर त्वरीत संपर्क साधावा

  • अहमदनगर, नाशिक, चंद्रपुर, जालना, गोंदिया, कोल्हापुर-18002660700( एच.डी.एफ.सी. ॲग्रो इन्शुरन्स कं.लि.)
  • सोलापुर, जळगाव, सातारा, औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, उस्मानाबाद, लातुर -18004195004 (भारतीय कृषि विमा कंपनी लि.)
  • परभणी, वर्धा, नागपुर, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे – 18001037712 (आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं.लि.)
  • नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग -18002335555 (युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि.)
  • बीड 18002095959 (बजाज अलियांन्झ जनरल इन्शुरन्स कं.लि.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *