गोंदियाच्या मातीत गवती चहा आणि सिट्रोनिलाचा प्रयोग

गोंदिया  जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने गवती चहा आणि सिट्रोनिला वनस्पतीची यशस्वी लागवड केली आहे.

गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील गोरेगाव (Goregaon) तालुक्यातील सोनी या गावातील एका शेतकऱ्यानं गवती चहा (lemon grass) आणि सिट्रोनिला शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय.

 
प्रतिकुल भौगोलिक वातावरण असतानाही या शेतकर्‍यानं एक एकर शेतीमध्ये गवती चहा आणि सिट्रोनिला वनस्पतीची लागवड केली आहे. त्या एक एकरमध्ये त्यांना जवळपास एक लाख ते एक लाख 20 हजार रुपपर्यंतचे उत्पन्न होईल अशी आशा आहे.
 
गोरेगाव तालुक्यातील सोनी या गावातील कैलास बिसेन या शेतकऱ्याकडे वडिलोपार्जित सहा एकर शेती आहे. या शेतीमध्ये ते तांदळाचे पीक घेत असतात. पण यावेळी त्यांनी गवती चहाचे उत्पादन घेतलं.
 
तांदूळ पिक घेण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी लागते. मात्र, दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जात असल्यानं आणि खत, कीटकनाशके यांच्या वाढत्या किंमतीमुळं तांदळाची शेती परवडत नसल्यानं त्यांनी एक एकर शेतीमध्ये गवती चहा आणि सिट्रोनिला वनस्पतीची लागवड केली आहे.
 
क एकरमध्ये त्यांना जवळपास एक लाख ते एक 20 हजार रुपयापर्यंत उत्पन्न होईल अशी आशा आहे.
 
एक लिटर सिट्रॉनिलच्या तेलला 750 ते 800 रुपयांचा दर मिळतो तर गवती चहाच्या 1 लिटर तेलाला 1200 ते 1500 रुपयापर्यंतचा दर मिळतो. यासाठी मुंबई आणि नागपूरमध्ये बाजारपेठा उपलब्ध आहेत.
 
गवती चहा आणि सिट्रॉनिला या औषधी वनस्पती आहेत. ज्याचे आरोग्यासाठी भरपूर असे फायदे आहेत
 
याचा वापर औषध, कॉस्मेटिक आणि डिटरजंटमध्ये केला जातो. कमीत कमी गुंतवणूक करुन सर्वात जास्त नफा मिळवून देणारी ही अशी औषधी वनस्पती आहे.
 
कैलास बिसेन यांनी आपल्या शेतातील एक एकरमध्ये सिट्रोनिला आणि गवती चहा वनस्पतीची लागवड केली आहे. भविष्यात पाच ते सात एकर क्षेत्रात ही लागवड करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
 
Source:- marathi.abplive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *