हमीभाव खरेदी केंद्रांमुळे सोयाबीनचे भाव वधारणार का? अशी करा नोंदणी…
ऐन मतदानाच्या तोंडावर केंद्र सरकारने महाराष्ट्रात सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याचा आदेश दिला असून काल दिनांक १८ नोव्हेंबरपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. यातील काही सोयाबीन खरेदी नाफेडच्या माध्यमातून होणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून आता सर्वच प्रकारचा सोयाबीन खरेदी केला जाणार असून याआधी १२ टक्के ओलाव्याचे निकष होते, ते वाढवून आता १५ टक्के करण्यात आल्याने […]
कांदा खरेदी घोटाळ्यामुळे पुढील पंधरवड्यात लाल कांद्याचे भाव वाढणार?
Red onion market price will hike due to Nafed and nccf onion Scam in next 15 daysमागील काही दिवसांपासून बाजारातील उन्हाळी कांद्याचा दर साठा संपत आल्याने वाढले आहेत, तर दुसरीकडे खरीपातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू न झाल्याने कांद्याचे भाव वधारलेलेच आहेत. मागील आठवड्यात कांद्याच्या दरात काहीशी घसरण पाहायला मिळाली असली, तरी आगामी काळात […]
बियाणांची आठ हजार वाण आता खरेदी करा ऑनलाईन…
शेती व बागकामासाठी दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सरकारी इ मार्केट (GeM) पोर्टल वर बियाण्यांचे 170 श्रेणी विक्रीसाठी दाखल झाले आहेत. या पोर्टलवर आता बियाण्यांची सुमारे 8,000 वाणे उपलब्ध असून येणाऱ्या शेतकी हंगामात राज्य तसेच केंद्रसरकारी कंपन्यांना देशभरात पुढील वितरणासाठी उपयोगी पडावीत यादृष्टीने त्यांची रचना केली आहे. शेतकऱ्यांना https://gem.gov.in/ येथून ते खरेदी करता येतील. […]
जनावरांमध्ये दुधाचा ताप येणे म्हणजे काय असते? त्यावर कशी मात करायची?
जनावरांना दुधाचा ताप येणे किंवा दुग्धज्वर किंवा मिल्क फिवर हा आजार साधारणपणे जास्त दूध देणा-या गाई आणि म्हशींमध्ये आढळून येतो. जास्त दूध देणारी जनावरे त्यांच्या तिस-या ते पाचव्या वितामध्ये या आजारास बळी पडण्याचे प्रमाण मोठे आहे. पहिल्या किंवा दुस-या वितामध्ये जनावरे कमी वयाची किंवा तरुण असतात. या वयामध्ये जनावराची चा-यातील क्षार शोषण्याची क्षमता तसेच हाडांमध्ये […]
*द्राक्ष घडांची ऑक्टोबर छाटणीनंतर अशी घ्या काळजी*
सध्याचा काळ द्राक्षांच्या घडवाढीचा असून, या दिवसांत ऑक्टोबर छाटणीनंतर द्राक्षबागेची निगा राखणे गरजेचे आहे. ऑक्टोबर छाटणीनंतर येणार्या फुटीतून द्राक्षाचे घड बाहेर पडल्यानंतर त्याच्या देठाची लांबी वाढू लागते. घडातील पाकळ्या पसरून वाढू लागतात. योग्य हवामानात घड वाढू लागतात. सुरुवातीला घड पोपटी असतो. घडापुढील फुटींची तीन पाने मोकळी होताना त्या घडाचा रंग हिरवा होऊ लागतो. द्राक्ष पिकावर […]
टोमॅटोच्या दरात महिनाभऱात 22 टक्क्यांहून अधिक घसरण, असे आहे कारण..
मंडईतील दर कमी झाल्यामुळे टोमॅटोच्या किरकोळ दरात घसरण झाली आहे. देशामध्ये 14 नोव्हेंबर रोजी टोमॅटोची सरासरी किरकोळ किंमत प्रति किलो 52.35 रुपये होती. एका महिन्यापूर्वी 14 ऑक्टोबर रोजी हा दर प्रति किलो 67.50 रुपये होता. त्या तुलनेत हे दर 22.4% ने कमी झाले आहेत. याच कालावधीत, आझादपूर मंडईतील सरासरी दर निम्म्याने म्हणजे सुमारे 50% घसरून […]
विधानसभा मतदानासाठी शेतकरी सज्ज, उद्या होणार मतदान…
राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या मतदानासाठी शहरी मतदारांसमवेत ग्रामीण मतदार व शेतकऱ्यांमध्ये उत्साह असून विविध समस्यांनी ग्रस्त झालेला शेतकरी मतदानाच्या माध्यमातून प्रतिनिधी निवडण्यासाठी सज्ज झाला आहे. राज्यातील 9 कोटी 70 […]
हे १० उपाय करा आणि हिवाळ्यात कोंबड्यांमधील रोग दूर ठेवा
कुक्कुटपालनातून उत्पन्न मिळवायचे असेल तर हिवाळा ऋतूत पक्ष्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी हे दहा उपाय आवश्यक आहेत. 1. हिवाळ्यामध्ये शरीर तापमान टिकविण्यासाठी व उबदारपणासाठी पक्षी जास्त प्रमाणात खाद्य खातात. यामुळे खाद्यावरील खर्च जास्त होतो तसेच ऊर्जा तयार करण्यासाठी न लागणारी पोषणतत्वे वाया जातात. त्याकरिता खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी व खाद्याचा अपव्यय टाळण्यासाठी ऊर्जायुक्त खाद्य […]