bollworms on cotton : कपाशीवरील बोंडअळी रोखण्यासाठी कमी खर्चातील उपाय !

कापूस पिकात बोंडांची वाढ सुरू होताच बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. बोंडअळीमुळे कळ्या, फुले आणि कोवळ्या बोंडांचे नुकसान होऊन उत्पादनात मोठी घट येऊ शकते. त्यामुळे महागड्या कीटकनाशकांवर अवलंबून न राहता सुरुवातीपासूनच एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या कमी खर्चातील उपाययोजना करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. शेताची नियमित पाहणी, बाधित भाग काढून नष्ट करणे, फेरोमोन सापळ्यांचा वापर आणि योग्य […]
October heat : ऑक्टोबर हीटचा कोंबड्यांना फटका , उष्णतेचा ताण रोखण्यासाठी करा हे महत्त्वाचे उपाय !

ऑक्टोबर महिन्यात वाढणारे तापमान आणि हवेतील आर्द्रता यामुळे कोंबड्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढते. या काळात कोंबड्यांची खाद्य खाण्याची क्षमता कमी होणे, अंडी उत्पादनात घट, वजनवाढ मंदावणे आणि मृत्युदर वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात. बंदिस्त पोल्ट्री शेडमध्ये योग्य हवा खेळती न राहिल्यास उष्णतेचा ताण अधिक तीव्र होतो. त्यामुळे कुक्कुटपालकांनी शेडचे तापमान नियंत्रित ठेवण्यासह पाणी, […]