केंद्र सरकारच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांच्या विकासासाठी अनेक योजना राबवण्यात येत असतात. या योजनेच्या माध्यमातून अशा घटकांची आर्थिक उन्नती व्हावी आणि त्यांना व्यवसाय उभारता यावा या प्रकारचा सरकारचा उद्देश आहे.
स्वतंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना ‘विश्वकर्मा योजना’ जाहीर केली व या योजनेला आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
विश्वकर्मा योजनेचे स्वरूप कसे आहे,
ही योजना विशिष्ट शैलीतील कुशल कामगारांसाठी असून या योजनेचे पूर्ण नाव विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना किंवा पीएम विकास योजना असे ठेवण्यात आलेले आहे. या योजनेमध्ये 13 ते 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून या योजनेअंतर्गत कमाल 5% व्याजासह एक लाख रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे.
अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा पूजेच्या निमित्ताने विश्वकर्मा योजना सुरू करण्यात येणार असून, याच दिवशी नरेंद्र मोदी त्यांचा वाढदिवस देखील आहे.
या योजनेच्या माध्यमातून आता कौशल्य प्रशिक्षण तसेच तंत्रज्ञान आणि आर्थिक सहाय्य देऊन देशातील जे काही कारागीर आहेत त्यांची क्षमता वाढविण्याकरिता या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून कुशल कारागिरांना एमएसएमईशी जोडले जाणार असून, त्यांना या माध्यमातून चांगली बाजारपेठ मिळणे शक्य होणार आहे.
कुणाला मिळेल या योजनेचा लाभ?
या योजनेचा लाभ सुतार ,शिल्पकार, कुंभार ,सोनार या क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींना होणार आहे.या योजनेच्या माध्यमातून या कारागिरांच्या उत्पन्नाचा, सेवांचा दर्जा वाढवणे तसेच जागतिक देशांतर्गत बाजारपेठेची जोडण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
तसेच लोहार ,कुलूप बनवणारे ,सोनार, गवंडी ,बोट बनवणारे कारागीर यांचा देखील योजनेमध्ये समावेश असणार आहे.
या योजनेअंतर्गत कसा मिळेल लाभ?
या योजनेच्या माध्यमातून आता कारागिरांना पीएम विश्वकर्मा ओळखपत्र प्रमाणपत्र तसेच क्रेडिट सपोर्ट म्हणून एक लाख रुपये पहिल्या टप्प्यांमध्ये तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन लाख रुपये पाच टक्के सवलतीच्या व्याजदरांमध्ये दिले जाणार आहे. याला मान्यता देखील देण्यात आली आहे.