राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आणि कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून ज्या काही योजना राबवतात त्या योजनेच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात येते. जेणेकरून कृषी क्षेत्रातील विकासाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून या योजनांचे महत्त्व आहे.
या योजना मधील एक महत्त्वाची योजना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा विचार केला तर ही राज्याच्या फलोत्पादन विभागाकडून राबविण्यात येते व याअंतर्गत फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते.
यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात म्हणजेच फळबाग लागवडीकरिता आवश्यक खड्ड्यांची खुदाई, ठिबक सिंचन इत्यादी कामांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते. 15 फळ पिकांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
सहा जुलै 2018 रोजी राज्य सरकारने ही योजना राबवण्यास मान्यता दिलेली असून यामध्ये कलम लागवड करणे, पीक संरक्षण नांग्या भरणे पाणी देण्याकरता ठिबक सिंचनाची व्यवस्था इत्यादी कामे करण्याकरता शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान मिळते. यापैकी ठिबक सिंचनाचे जे काही अनुदान आहे ते राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असते . आता खताकरिता अनुदान येण्याची महत्त्वपूर्ण घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.
आवश्यक खतांसाठी शेतकऱ्यांना मिळणार शंभर टक्के अनुदान..
फळबाग लागवडीच्या माध्यमातून ठिबक सिंचन करण्याकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान मिळते . आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमधून ठिबक सिंचन ऐवजी आता सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच अर्थसंकल्पामध्ये 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती देखील राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी या योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान देखील धनंजय मुंडे यांनी केले तसेच गरज भासल्यास शंभर कोटींच्या तरतुदीमध्ये आणखीन वाढ करण्यात येईल अशी देखील त्यांनी माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.