किसान कर्ज पोर्टल द्वारे किसान क्रेडिट कार्ड केसीसी धारकांना तारण न देता आणि अनुदानासह कर्ज मिळते. किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकरी त्यांच्या कृषीउद्देशासाठी किंवा त्यांच्या गरजांसाठी अत्यंत स्वस्त दरात कर्ज घेऊ शकतात.
केसीसी द्वारे मिळणारे कर्ज सवलतीच्या व्याजावर दिले जाते, जे शेतकरी या कार्डद्वारे कर्ज घेऊन वेळेवर परतफेड करतात . त्यांना विशेष सवलती देखील मिळतात.
काय आहे किसान क्रेडिट कार्ड?
किसान क्रेडिट कार्ड योजना ही शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येते. शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत लागली तर ते या माध्यमातून सहज कर्ज घेतील . योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांना बियाणे, कीटकनाशके, खते किंवा शेतीचे उपकरणे खरेदी करता येतात . या क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना कोणत्याही हमी शिवाय 1.6 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. याद्वारे शेतकरी तीन वर्षात पाच लाख रुपये पर्यंत कर्ज घेऊ शकतात.
या कार्डद्वारे शेतकरी गरजेनुसार कर्ज घेऊ शकतात. या किसान क्रेडिट कार्डची वैधता पाच वर्षे असते. ज्या शेतकऱ्यांकडे केसीसी असेल त्यांना गावातील कोणत्याही सावकाराकडे पैसे मागण्याची गरज नसते.
शेतकरी किसान क्रेडिट कार्ड द्वारे पाच वर्षात तीन लाखापर्यंतचे अल्पमुदतीचे कर्ज घेऊ शकतात . शेतकऱ्यांना 9% दराने कर्ज मिळते. मात्र सरकार त्यावर दोन टक्के अनुदान देते . त्यावर सात टक्के व्याजदर होत असते, जर शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली तर त्यांना आणखीन तीन टक्के सूट दिली जाते ,अशाप्रकारे कर्जवर फक्त चार टक्के व्याज भरावे लागते.
क्रेडिट कार्ड साठी अर्ज कसा करावा.
सर्वात आधी पीएम https://pmkisan.gov.in/ किसन गव्हर्मेंट इन या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
नंतर किसान क्रेडिट कार्डचा अर्ज डाऊनलोड करावा.
या अर्जामध्ये तुम्हाला जमिनीचे कागदपत्रे आणि पिकाची माहिती भरावी लागेल.
तसेच तुम्ही तर बँक किंवा इतर शाखेकडून दुसरे कोणते किंवा किसान क्रेडिट कार्ड बनवले आहे का नाही हे सांगावे लागेल.
अर्ज भरल्यानंतर सबमिट करा.
त्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळेल.
कागदपत्रे :
मतदान ओळखपत्र .
पासपोर्ट साईज फोटो .
आधार कार्ड,
ड्रायव्हिंग लायसन्स,
पॅन कार्ड.
कोण आहेत केसीसी साठी पात्र..
अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या नावावर शेती असावी.
भाग पीक ,भाडेकरू शेतकरी, स्वयंसहायता गट असेल तर ते अर्ज करू शकतात.
जे शेतकरी शेती किंवा पशुपालन करतात.
ज्या मच्छीमारांकडे नोंदणीकृत बोट किंवा इतर कोणत्याही प्रकारची मासेमारी नौका असेल.
ज्याच्याकडे मासेमारीसाठी आवश्यक परवाना आहे.
असे शेतकरी जे पोल्ट्री करतात.
डेअरीचा व्यवसाय करणारे शेतकरी.