आजचा आपला विषय आहे कमी खर्चात शेळीपालन कसे करायचे ? आज-काल बरेच युवक व शेतकरी शेळी पालन मध्ये करिअर करण्याचा विचार करत असतात. किंवा शेळी पालन हा व्यवसाय करायचा असे ठरवत आहेत. शेळीपालन सुरू करताना पहिला प्रश्न असतो की भांडवल किती लागेल आणि एवढे भांडवल कसे उभे करायचे तर आज आपण कमी खर्चात शेळी पालन कसे करायचे पाहणार आहोत.
मित्रांनो शेळी पालन मध्ये जर लवकरात लवकर फायदा मिळवायचा असेल एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आपण सुरुवातीला गुंतवणूक जास्त केली तर प्रॉफिट आणि फायदाही लवकर मिळतो.
शेळीपालनामध्ये कमीत कमी सुरुवातीच्या काळात पैसे लावण्याचा प्रयत्न करा . कमी गुंतवणुकीमध्ये शेड कसे उभे करायचे चारा कसा तयार करायचा व प्राणी कसे घ्यायचे आत्ता या लेख मध्ये सांगणार आहोत.
कमी खर्चात शेड कसे उभे करायचे?
शेळी पालन सुरु करत असताना बऱ्याच लोकांचा असा हट्ट असतो की लाखो मध्येच खर्च करायचा शेळीपालनाचे शेड उभे करण्यासाठी खरंच हे गरजेचे आहे का? जर एवढी गुंतवणूक शेडमध्ये केली तर त्या शेड चे पैसे मिळवण्यासाठी किती वर्षे लागतील हे शेड शेळीपालनाची आर्थिक गणित धरून आहे का? याचा पण नक्कीच विचार केला पाहिजे.शेड उभे करताना सुरुवातीला एवढा खर्च करणे गरजेचे नाही जर आपण हे फायद्यासाठीच करत असेल तर जास्त खर्च करणे नक्कीच टाळायला पाहिजे ज्यांना अतिशय कमी खर्चामध्ये जर शेड उभे करायचे आहे तर त्यांच्यासाठी शेड कसे असावे हे आपण सांगणार आहोत तर त्यामध्ये शेड उभा करत असताना लाकडाचा किंवा बांबूचा सांगाडा आपण उभा करू शकतो. अतिशय कमी खर्च मध्ये हा सांगाडा उभा राहू शकतो.
त्या सांगड्याच्या बाजूने भिंतही बांधायची गरज नसते. आपण त्या ठिकाणी जाळी युज करू शकतो. जाळी सभोवताली बांधून त्याची कंपाऊंड तयार करू शकतो तसेच शेडच्या छताचा विचार केला तर गवताच्या छताचाही वापर करू शकतो. जर आपल्याकडे पाऊस जास्त असेल तर त्या ठिकाणी आपण पत्र्याचाही वापरू करू शकतो.
शेवटचा मुद्दा येतो की तळ कसा असावा जर आपल्याकडे तळ मुरमाचा असेल त्याच्यावरती आपण लाकडी पाठ किंवा चौथरा तयार करून त्याच्या त्यावर आपण दीड ते दोन फूट यांचा फळा टाकून पाठ तयार करू शकतो. त्यामुळे प्लॅटफॉर्म तयार करून घेऊ शकतो.शेड हे जमिनीपासून दोन ते तीन फूट उंच असले पाहिजे.
दुसरा मुद्दा म्हणजे चारा?
चाऱ्याचे व्यवस्थापन करत असताना जमिनीची किती आवश्यकता आहे. किंवा एका एकरामध्ये किती शेळ्यांचे संगोपन आपण करू शकतो चारा व्यवस्थापनामध्ये आपण गवत घासायची स्टंप लावू शकतो . त्यामधून चांगले उत्पादन मिळते . अशाप्रकारे आपण शेताचा बांध उपयोगात आणू शकतो. दुसरा प्रकार म्हणजे आपल्याकडे पडीक जमीन असते. त्या पडीक जमीन वर आपण शेवरी सु बाभळीची झाडे लावू शकतो. जर आपल्याकडे तेवढे चारा क्षेत्र नसेल तर आपण मुरघास करू शकतो. मुरघास हा पण वर्षभर वापरत आणू शकतो. तसेच पौष्टिक असल्यामुळे आपण जनावरांना दिला तर फायदाही आपल्याला लवकरच मिळतो.
पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्राणी
शेळीपालन सुरू करताना बरेच लोकांची गैरसमजत असते. शेळीपालन मध्ये फायदा मिळवायचा असेल तर उच्च प्रतीच्या शेळ्या घेतल्या पाहिजेत. जर आपल्याला शेळी पालन मध्ये फायदा मिळवायचा असेल तर लोकल ब्रीड म्हणजे गावातील ब्रीड युज केली पाहिजे जर ती शक्य नसेल आपल्याला आणखीनच संकरित पाहिजे असेल तेव्हा आपण उस्मानाबादी संगमनेरी या जाती वापराण्यात आणू शकतो. अशा जातींची प्रजनन क्षमता देखील चांगली असते. यासाठी आपल्या वातावरणामध्ये मिसळतात काही दिवसाच्या अनुभवानंतर जर आपल्याला असे वाटले की या लोकल ब्रेडच्या वापरामुळे आपल्याला तेवढा फायदा मिळत नाही त्यासाठी आपण चांगला एखादा संकरित बोकड युज करू शकतो.
आरोग्यावरील खर्च
शेळी पालन कमी खर्चात करायचे असेल तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आपण सगळ्यात अगोदर सांगितले की नेहमी स्वच्छ वातावरण ठेवावे यामुळे प्राणी ही निरोगी राहतील. त्यांची वाढ ही झपाट्याने होईल.
खुराक व्यवस्थापन
प्राण्यांना पाणी व खुराक वेळेवर देणे खूप महत्त्वाचे आहे. जर आपण यात खुराक व पाणी वेळेवर दिले तर त्यांचे पचनक्रियेला देखील चांगला फायदा होतो व तसेच योग्य तो टाइमिंग ची सवय त्यांना लागते रवण करण्यास देखील त्यांना वेळ मिळतो आधुनिक शेळीपालन व्यवसायामध्ये या ठराविक गोष्टी पाळणे खूप गरजेचे आहे.तरच आपल्याला यश मिळते.