कमी खर्चात लाखोंचा नफा; भरघोस उत्पन्न देणाऱ्या पेरू बागेच्या लागवडीचे तंत्रज्ञान, वाचा सविस्तर ..

 नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी २४.कॉम मध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण जो लेख बघणार आहोत .त्या लेखचा विषय आहे पेरू लागवडी विषयी संपूर्ण माहिती.  या संपूर्ण माहिती मध्ये आपण काय-काय सांगणार आहोत तर पेरूच्या जाती कोणत्या आहेत? आपण कोणती जात निवडली पाहिजे ? आपल्यासाठी कोणती जात योग्य आहे ? कशा प्रकारच्या जमिनीमध्ये पेरूची लागवड केली पाहिजे?  त्यानंतर पेरूच्या लागवडीचे योग्य अंतर किती ,पेरूचे उत्पादन कसे निघते ? कोणती कोणती कामे पेरू मध्ये करावी लागतात ? पेरू लागवड फायदेशीर आहे का ? त्याचे उत्पादन कशा पद्धतीने निघते या सर्व गोष्टींविषयी आज आपण सविस्तर या लेखामध्ये बघणार आहोत,

शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल: 

लखनऊ ४९ म्हणजेच सरदार या पेरूच्या जातीची लागवड आपण या ठिकाणी पाहणार आहोत .तर या जातीची लागवड आपण का करावी ? या सर्व गोष्टीं विषयी आपण आज या लेख मध्ये सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत .  कोणत्या ही शेतकऱ्यांच्या मनामध्ये ज्यावेळेस कोणतेही पीक लावायचे म्हटलं तर सगळ्यात पहिला प्रश्न निर्माण होतो की मी कोणती जात निवडू .यासाठी आपल्याकडे दोन गोष्टी उपलब्ध आहेत.  एक म्हणजे गावठी जाती म्हणजेच गावरान जाती  आणि एक म्हणजे विलायती जाती.  जर गावठी जातींमध्ये आपण बघितलं सरदार आहे तसेच लखनऊ49,  जीविलास आहे. तसेच आपण विलायती जाती बघितल्या तर त्यामध्ये  आहे थाय 7 ,तैवान पिंक आहे अशा प्रकारच्या जाती आपल्याला मार्केटमध्ये बघण्यास मिळत असतात.  गावठी जात लावली पाहिजे का विलायती जात लावली पाहिजे ? हे सर्व  शेतकऱ्याकडे कोणकोणती साधने उपलब्ध आहेत . त्यावर अवलंबून आहे.  शेतकऱ्यांकडे वेळ किती उपलब्ध आहे त्यावरही अवलंबून आहे तसेच शेतकरी त्या बागेकडे किती लक्ष देणार या गोष्टीवर सुद्धा आपण जात कोणती निवडायची हे अवलंबून आहे कारण ज्या विलायती जाती आहेत त्यामध्ये आपल्याला शेतामध्ये जास्त लक्ष द्यावे लागते, जास्त काम करावे लागते, 

विलायती जातीमध्ये पेरूला उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून  त्याला पिशवी लावावी लागते.  त्यानंतर मार्केटमध्ये जेव्हा हा पेरू न्यायचा असतो.  तेव्हा पेरूला फॉर्म लावून पाठवावा लागतो, तसेच या पेरूची वजन खूप जास्त असते विलायती पेरूचे वजन हे 400 ग्रॅम पेक्षा जास्तच होते त्यामुळे झाडाला सुद्धा हे झेपवत नाही.

झाडाला सुद्धा तो माल पेलवत नाही. त्यामुळे त्याला आपल्याला तारकाठी किंवा बांबूचा आधार देऊन झाड उभे करावा लागते . अशा प्रकारची बरीच कामे आपल्याला विलायती पेरू च्या बागेमध्ये करावी लागतात.  विलायती पेरूमध्ये आणखीन एक त्रास आहे की फवारण्यांचं शेडूल हे व्यवस्थित रित्या ठेवावे लागते.  विलायती पेरूमध्ये एक जरी पेरू खराब झाला तरी 400 ते 500 ग्रॅम आपल्याला फटका बसणार आहे.हा झाला विलायती पेरू मधला ड्रॉ बॅक. 

तसेच विलायती पेरूमध्ये सर्वात चांगली गोष्ट काय आहे, तर विलायती पेरूला बाजारामध्ये चांगली मागणी आहे व त्याची टिकवण क्षमता ही चांगली असल्यामुळे विलायती पेरू हा बाजारामध्ये पटकन उचलला जातो. विलायती पेरू हा गोडीला जरा कमी असतो परंतु खाण्यासाठी खोबऱ्यासारखा मऊ लागतो त्यामध्ये बियाणांचे प्रमाण कमी असते . त्यामुळे विलायती पेरूला बाजारामध्ये जी मागणी आहे त्या मागणी वेळेला दर तेजीत असतात त्यावेळी मार्केटमध्ये बाजार भाव खूप छान मिळतो.  त्याच तुलनेमध्ये आपण जर देशी पेरू बघितला तर बाजार भाव हा वीस रुपये तीस रुपये 35 रुपये किती तेजी आली तरी चाळीस-पन्नास रुपयांच्या पुढे देशी पेरू जात नाही.

देशी पेरूचा फायदा काय आहे देशी पेरूमध्ये आपल्याला फॉर्म लावावा लागत नाही फवारणीचे शेड्युल हे कमी असते.  थोडेसे इकडे तिकडे झाले तरी चालते तसेच देशी पेरूला उन्हापासून संरक्षण करण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही.  थोडासा पैसा देशी पेरूमध्ये कमी आहे परंतु शाश्वत पीक आहे.  विलायती पेरूमध्ये लक्ष तुम्हाला जास्त द्यावे लागते परंतु त्यामध्ये फायदाही त्याप्रमाणेच मिळणार आहे तुमच्याकडे वेळ किती शिल्लक आहे, तुमच्याकडे खूप जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही व्ही एन आर तैवान पिंक, थाय सेवेन कोणतीही जात निवडून लावली तर ती खूपच चांगली आहे.

परंतु जर तुमच्याकडे जमीन मुबलक आहे.  वेळ देखील खूप कमी आहे आणि तुम्हाला कुठली तरी फळबाग लावायची आहे त्याकडे तसेच त्याकडे कमी थोडेफार कमी लक्ष दिले तरी चालेल असे वाटत असेल कमी लक्ष म्हणजे त्याला तुम्हाला पाणी घालावे लागेल, छाटणी तुम्हाला करावीच लागेल ,टॉपिंग तुम्हाला करावेच लागणार आहे काही ठराविक काम आहेत ते तुम्हाला करावीच लागणार आहेत.  परंतु जास्तीचे लक्ष तुम्हाला या देशी पेरूमध्ये द्यावे लागणार नाही.  निसर्ग त्याला आपोआप पेरू लावणार आहे.या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला जात कोणती निवडायची हे तुम्हाला ठरवायचे आहे.

पेरू लागवडीसाठी हवामान: 

पेरूच्या बागेसाठी उष्ण आणि कोरडे हवामान अनुकूल असते त्याच्या चांगले उत्पादनासाठी 15 ते 30 सेल्सिअस तापमान योग्य मानले जाते सहन करते त्यामुळे या हवामानामध्ये पेरूची रोप अगदी सहज तयार करता येते हो मनातील जर उतरायचं त्यावर फारसा काही परिणाम होत नाही ज्या ठिकाणी पाणी अत्यंत कमतरता असते त्या ठिकाणी देखील पेरूचे पीक व्यवस्थित येते.

पेरूचे लागवडीसाठी चे अंतर किती असावे?

बरेच जण सांगतात की सहा फूट बाय सहा फुटावर लागवड करावी तसेच काहीजण म्हणतात की सहा फूट बाय आठ फुटावर लागवड करावी सहा फूट बाय सहा फूट किंवा सहा फूट बाय आठ फूट ही अति घन लागवड झाली . म्हणजेच झाडे खूप जवळजवळ येतील.  अशा लागवडीमध्ये झाडांची जे आयुष्य आहे हे तुम्हाला कमी मिळणार आहे.  बुरशीजन्य आजार आहे जे मुळांपासून उत्पन्न होणार आहे ते जास्तीत जास्त उत्पन्न होतील त्यामुळे झाडांमध्ये मराचे प्रमाण जास्त होईल.

साधारणपणे अंतर किती ठेवले पाहिजे तर तर खूप जास्त पण नको आणि खूप कमी पण नको असं दोन झाडांमधील अंतर दहा फुटाचे असावे आणि आणि झाडांच्या दोन ओळींमध्ये अंतर बारा फूट असावे म्हणजेच दहा फूट बाय बारा फुटावरती तुम्ही जर झाडे लावली तर या झाडांमधील आपल्याला मशागत सुद्धा ट्रॅक्टरने चांगल्या पद्धतीने करता येते.  त्यानंतर झाडांना जो पोषक वातावरण आहे ते मिळते.  तसेच खेळती हवा झाडांमध्ये राहते.  त्यामुळे आपल्याला उत्पादन देखील चांगल्या प्रकारे मिळते.

लागवड कोणत्या जमिनीमध्ये केली पाहिजे?

काळभोर जमिनीमध्ये, चिकन मातीमध्ये लागवड करावी का जिथे पाणी साठवून राहते.  तर त्या ठिकाणी लागवड ही केली नाही पाहिजे.  अशा जमिनीमध्ये लागवड केली पाहिजे ज्यामध्ये पाऊस पडला पाणी साठले ते एक दिवसांमध्ये पाणी निचरुन निघून जायला पाहिजे.  अशा जमिनीमध्ये तुम्हाला पेरू या फळबागेची लागवड करायची आहे.  त्यामुळे काय होईल की जर पाणी साचून राहिले फळाची जी मुळ आहेत त्यामुळे मुळांना बुरशीजन्य आजार होतील आणि तुमचं झाड त्या आजाराने मरून जाईल.  त्यामुळे ज्या जमिनीमध्ये पाणी साचणार नाही. पाणी साचून राहणार नाही .अशा ठिकाणी तुम्हालाही लागवड करायची आहे.

 झाडाची लागवड करण्याची पद्धत?

सगळ्यात महत्त्वाचे पेरूचे झाड लावल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे पाणी घालणे आणि लागवड करत असताना दोन फूट बाय दोन फुटाचा खड्डा घेणे त्या खड्ड्यामध्ये साधारण चार ते पाच किलो शेणखत टाकायचे 10 26 26 जर असेल तर थोडेफार म्हणजेच 50 ते 100 ग्रॅम ते खत टाकणे . त्या खड्ड्यामध्ये पाणी सोडून त्यामध्ये झाडाची लागवड तुम्हाला करायची आहे.  एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही लागवड होते जर तुम्हाला दोन फूट बाय दोन फुटाचा खड्डा घेणे शक्य नसेल, तर नांगराने खोल चर घ्यायचाय इथून तिथून खोल चर घ्यायचंय त्यात चरामध्ये शेणखत व 10 26 26 टाकायचे आहे ,तसेच जर तुमचे जमिनीमध्ये बुरशीचे प्रमाण जास्त असेल तर एखादे बुरशीनाशक सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा जर तुमच्या जमिनीमध्ये किडीचे प्रमाण जास्त असेल तर आपल्या नवीन लावलेल्या देखील रोपाला कीड येऊ नये त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही हमला कॅनोन जे काही कीटकनाशक आहेत ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि त्या झाडाची लागवड करू शकता.

बाजारभाव कशा प्रकारे असतो .

झाड जोपर्यंत मातीमध्ये सेट होत नाही तोपर्यंत पाण्याचा त्याला  तोटा आला नाही पाहिजे,  ही एक महत्त्वाची गोष्ट आहे झाड लावल्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर झाड जोमाने वाढण्यास सुरुवात करते झाड ज्यावेळी जोमाने वाढण्यास सुरुवात करते त्यावेळी त्या झाडाचे तुम्हाला टॉपिंग करायचे आहे टॉपिंग करणे म्हणजे काय करायचं आहे झाडाला फांद्या फुटल्या पाहिजेत जेवढ्या झाडाला जास्त फांद्या फुटतील तेवढा माल जास्त निघेल. पेरूचे वैशिष्ट्य असे आहे की सगळेच पेरू एकाच वेळेस काढण्यासाठी येत नाहीत हे देशी पेरू एकाच वेळेस काढण्यासाठी येत नाहीत . त्यामुळे काय होते की बाजार भाव आता जरी कमी मिळाला तरी कुठे ना कुठेतरी बाजारभावाचा फायदा होतो माल एकदम निघत नसल्यामुळे त्याला बाजार भाव मिळतोच व त्यामुळे आपले पैसे होऊन जातात. देशी पेरूमध्ये वेगवेगळ्या स्टेजला बारीक मोठे पेरू असतात त्यामुळे याचा फायदा काय होतो तर शेतकऱ्याला खेळते भांडवल चालू राहते.बाकीच्या पिकांमध्ये हे खेळत भांडवल राहत नाही.  परंतु पेरू या पिकांमध्ये पेरू  भांडवल हे खेळते राहते. एकदा जर पेरू चालू झाला तर चार ते साडेचार महिने तुम्हाला त्या पेरूमध्ये तोडणी चालूच राहती समजा तुमच्याकडे जर पाचशे सहाशे झाड असतील तर पाचशे सहाशे झाडांमध्ये वीस कॅरेट 25 कॅरेट प्रती आठवड्याला तुमचा तोडा चालू राहील ज्या पद्धतीने तुम्ही त्या झाडाला खत देणार आहेत, पाणी देणार आहेत फवारण्या करणार आहेत, त्या प्रमाणात हे उत्पादन कमी जास्त होऊ शकते गावठी पेरूला दीड वर्षाच्या झाडाला किमान आठ ते दहा किलो माल निघतो.  जर विलायती पेरू असला तर त्याचे उत्पादन जास्त निघते कारण की त्याच्या एका पेरूचे वजन हे 400 ते 500 ग्रॅम असते गावठी पेरूच्या तुलनेत विलायती पेरूचा जर विचार केला तर विलायती पेरूच्या झाडा एका झाडाला वीस ते पंचवीस किलो एवढे पेरू निघतात.  उत्पादन किती निघते हे आपण शाश्वत पद्धतीने सांगू शकत नाही .प्रति झाड जर तुमचे दोन वर्षाचे जर झाड असेल देशी पेरूचे प्रती झाड हे कमीत कमी तुम्हाला आठ ते दहा किलो इतके फळ देते.

देशी पेरूची काय काळजी घ्यावी लागते? कोणत्या रोगापासून बचाव करावा लागतो ?

यावरती डाळिंब सारखे खूप फवारण्या पेरू बागेवर करावा लागत नाही.  एकच फवारणी दर महिन्यातून घ्यायची आहे ती फवारणी कोणती आहे तर कोणताही एक कीटकनाशक कोणताही एक बुरशीनाशक जे प्रमाणात चालणार आहे . त्यामुळे या फळांना कुठल्याही प्रकारची कीड लागणार नाही व कुठल्याही प्रकारचा रोग होणार नाही.  सगळ्यात महत्त्वाचा रोग म्हटलं तर कुठला आहे तर त्यामध्ये फळमाशी पेरू मध्ये सगळ्यात जास्त फळमाशी हा रोग जास्त प्रमाणात दिसतो.

फळमाशी म्हणजे काय तर पेरू मध्ये आळ्या तयार होतात.  जर तुम्ही पेरू खायला घेतला तर त्याच्या आत मध्ये तुम्हाला अळ्या दिसतात . तर ती आळी का येते तर ती फळमाशीमुळे येते त्यामुळे काय करावे लागते? आपल्याला ज्यावेळेस फळमाशी कधी येते तुमचे पेरू पक्वतेच्या दिशेकडे चाललेले असतात.  त्यावेळी तुम्हाला फळमाशीपासून पेरूचे बचाव करावा लागतो.  दर महिन्याला आपण जी फवारणी करतो.  त्याच्यातून सुद्धा फळमाशीच संरक्षण होते . परंतु पेरू जेव्हा पक्वतेकडे जातो त्यावेळी तुम्ही तुमच्या बागेमध्ये जे सापळे मिळतात गंध सापळे जे येतात ते लावून फळमाशीचा नर तुम्ही करू शकता जेणेकरून पुढची पैदास त्या फळमाशीची होणार नाही आणि आपली जी फळ आहेत ती फळमाशी पासून सुरक्षित राहतील थोडक्यात तुम्हाला याबाबत माहिती दिलेली आहे की पेरू लागवडीसाठी काय काय करावे लागते.

डाळिंबाची व पेरूची तुलना?

डाळिंबाची उत्पादन व पेरूचे उत्पादन मध्ये आर्थिकदृष्ट्या आपण तुलना करू शकत नाही.  परंतु डाळिंबामध्ये काम खूप जास्त असते.  त्या तुलनेमध्ये पेरूमध्ये काम कमी आहे.  डाळिंब तोडणीसाठी आले तर एका महिन्यात तुटून जातात व मार्केटला निघून जातात आणि एकदाच पैसे होतात जे काही होतील ते तसं पेरूचे नाही तो आपल्याला टप्प्याटप्प्याने पैसे देत राहतो जसं की आपल्याला खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते ते खेळत भांडवल आपल्याला पेरू देत राहतात . तसेच पेरूचे बहार किती निघतात दोन भार पेरूचे निघतात,अशाप्रकारे या लेखांमध्ये पेरू लागवडीविषयी संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *