पशुसंवर्धन विभागामार्फत 2021- 22 पासून केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत विविध तीन उप अभियंता समावेश केला आहे . यामध्ये पशुधन व कुक्कुट प्रजाती विकास उप अभियान पशुखाद्य व वैरण उप अभियान नाविन्यपूर्ण योजना व विस्तार उपभियानांचा समावेश आहे. पशुसंवर्धन विभागातर्फे राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत विविध योजनांकरता अर्ज सादर करण्याचे अहवाल करण्यात आलेली आहे.
पशुधन व कुक्कुट प्रजाती विकास उपभियानामध्ये ग्रामीण कुक्कुट, पालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकासामध्ये कमीत कमी 1000 अंड्यांवरील कुक्कुट पक्षांचे संगोपन व अंडी उबवणी केंद्राच्या स्थापनेकरिता 50 टक्के बँकेची कर्ज अथवा लाभार्थी हिस्सा एकवेळ पन्नास टक्के भांडवली अनुदान अधिक मर्यादा 25 लाख रुपये प्रति कुक्कुट युनिट आहे. ग्रामीण शेळी पालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकासामध्ये कमीत कमी 100 ,200, 300, 400 ,किंवा 500, शेळ्या मेंढ्या गटाची स्थापना करण्याकरिता 50% बँकेचे अथवा लाभार्थी एक वेळ 50 टक्के भांडवली अनुदान 10, 20, 30, 40, 50 लाख रुपये याप्रमाणे दोन त्यामध्ये अधिकतम मर्यादा 50 लाख रुपये आहे.वराह पालनाद्वारे उद्योजकता विकासामध्ये शंभर मादी व 25 नर इत्यादी वराह गटाची स्थापना करण्यासाठी उर्वरित पन्नास टक्के बँकेची कर्ज अथवा लाभार्थी हिस्सा एक वेळ 50% भांडवली अनुदान आहे वीस लाख रुपये.
पशुखाद्य व वैरण उप अभियान मध्ये गुणवत्तापूर्ण वैरण बियाणे उत्पादन करिता अनुदान शंभर टक्के मूलभूत बियाणे अडीचशे रुपये प्रति किलो उत्पादनासाठी अनुदान तसेच पायाभूत बियाणे दीडशे रुपये प्रति किलो उत्पादनासाठी अनुदान व प्रामाणिक बियाणे 100 रुपये प्रति किलो उत्पादनासाठी अनुदान देण्यात येते. तसेच पशुखाद्य व वैरण उद्योजकतेमध्ये मुरघास बैल, वैरणीच्या विटावी, टी एम आर निर्मिती करिता दोन टप्प्यांमध्ये सीड बी मार्फत अनुदान उर्वरित पन्नास टक्के बँकेचे कर्ज किंवा लाभार्थी हिस्सा राहणार आहे.
या योजनेसाठी प्रकल्प अहवाल सातबारा, बँकेचा रद्द केलेला धनादेश ,बँकेच्या संमती पत्र ,आधार कार्ड ,पॅन कार्ड, इलेक्ट्रिक बिल अनुभव प्रमाणपत्र दहा टक्के लाभार्थीचा जमा असल्याची बँकेचे स्टेटमेंट, प्रशिक्षण प्रमाणपत्र ,पशुसंवर्धन विभागामार्फत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत विविध कुक्कुटपालन, वराहपालन, शेळी ,मेंढी ,क्षेत्र आणि वैरण विकास रोजगार निर्मिती उद्योजकता विकासासाठी पशुपालनांनी राष्ट्रीय पशुधन अभियानामध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी या संकेतस्थळावर udymimitra.gov.in अर्ज करावा. असे आव्हान जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर आर एस पाटील यांनी केले आहे.