केंद्र सरकारकडून रब्बी पिकाचे हमीभाव जाहीर , कोणत्या पिकाला किती मिळाला हमीभाव ? वाचा सविस्तर..

केंद्र सरकारने हंगाम 2024 – 25 साठी रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर केले आहेत . यामध्ये राज्याचे महत्त्वाचे रब्बी पिक असलेले हरभऱ्याच्या हमीभावात 105 रुपयांची वाढ केली.  म्हणजेच यंदाच्या रब्बी हरभऱ्याला 5 हजार 440 रुपये  हमीभाव असेल.

तर गव्हाचा हमीभाव 150 रुपयांनी वाढवण्यात आला असून मसूरच्या हमीभावात सर्वाधिक 425 रुपये वाढ करण्यात आली आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाने हंगाम 2024- 25 च्या रब्बी हंगाम पिकाच्या हमीभाव वाढीला मान्यता दिली. रब्बी हंगामात हरभरा हे राज्याचे मुख्य पीक आहे.  देशात कडधान्याचा पुरवठा कमी असल्याने मागील काही आठवड्यापासून हरभऱ्याचा भाव वाढला आहे.  तसेच देशातील दुष्काळी स्थिती आणि कडधान्याचा तुटवडा  लक्षात घेऊन सरकारने उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

त्यामुळे यंदाच्या हंगामात केंद्र सरकार हरभऱ्याच्या हमीभावात किती वाढ करते याकडे सर्वांचे लक्ष होते.  पण सरकारने हमीभावात केवळ 105 रुपयांनी वाढ केली . म्हणजे हरभऱ्याचा हमीभाव 5440 रुपयांवर पोहोचला आहे . मागील हंगाम हरभऱ्याला 5 335 रुपये हमीभाव होता.सरकारने गव्हाच्या हमीभावातही दीडशे रुपयांची वाढ केली.  गव्हाचा हमीभाव  २ हजार २७५ रुपयांवर पोचला.  मागील हंगामात गव्हाचा हमीभाव २ हजार १२५ रुपये होता. मोहरीच्या हमीभावात दोनशे रुपयांनी वाढ करून पाच हजार सहाशे पन्नास रुपये करण्यात आली.  सूर्यफुलाच्या हमीभावामध्ये मात्र केवळ दीडशे रुपयांची वाढ करण्यात आली.  यंदा सूर्यफुलाला 5800 रुपयांचा आधार मिळाला.

मसूर ला सर्वाधिक वाढ.

केंद्र सरकारने हरभरा उत्पादकांची काहीशी नाराजी केली असली तरी महसूल उत्पादकांना मात्र काहिसा दिलासा दिलेला आहे.  मसूर च्या हमीभावामध्ये सर्वाधिक 425 रुपये वाढ केली असून मसूरचा हमीभाव आता 6425 रुपयांवर पोहोचला आहे.  मसूर हे काही प्रमाणात तुरीला पर्याय समजले जाते.  देशात तुरीचा तुटवडा असून भाव वाढलेले आहेत . काही करूनही तुरीचे भाव कमी होत नसल्याने तुरीला पर्याय ठरू शकणाऱ्या मसूर चे उत्पादन वाढविण्याचा सरकारचा उद्देश आहे.  हमीभावात चांगली वाढ झाल्याने शेतकरी पेरा जास्त वाढू शकतात.  सरकारने खरेदीची हमी दिली आहे.  पण देशात कमी पडलेला पाऊस आणि धरणांमधील कमी पाणीसाठा यामुळे उत्पादन वाढीवर मर्यादा येऊ शकतात.

रब्बी हंगामातील हमीभाव जाहीर करताना पुन्हा एकदा सरकारने उत्पादन खर्चावर नफा दिल्याचे म्हटले जाते.  केंद्रीय मंत्रिमंडळाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,  यंदा गव्हाला उत्पादन खर्च वर 102% नफ्यासह हमीभाव जाहीर केला आहे.  कारण गव्हाचे उत्पादन खर्च ११२८  रुपये असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे तर हरभऱ्याचे उत्पादन खर्च 3400 असून त्यावर 60% नफा गृहीत धरून 5440 रुपये हमीभाव जाहीर केला आहे . तसेच मोहरीला 98 टक्के महसूल 89% बार्बी ला 60 टक्के आणि सूर्यफुलाला 52% नफ्यासह हमीभाव जाहीर केला असे केंद्राने म्हटले आहे. 

पीकनिहाय हमीभावात केलेली वाढ
पीक…वाढ…हमीभाव
हरभरा…१०५…५४४०
गहू…१५०…२२७५
मसूर…४२५…६४२५
मोहरी…२००…५६५०
सूर्यफुल…१५०…५८००
बार्ली…११५…१८५०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *