मध्यप्रदेश सह चार राज्यांमध्ये सीसीआयची कापूस खरेदी सुरू महाराष्ट्रातही खरेदीची तयारी पूर्ण..

देशात कापूस दरावर दबाव वाढला आहे.  ही स्थिती लक्षात घेता शासनाने खरेदी संबंधी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना आधार दिला असून , हरियाणा, राजस्थान पंजाब, मध्य प्रदेशात भारतीय कापूस महामंडळाने सीसीआय खरेदी सुरू केली आहे . ७०२० रुपये प्रतिक्विंटल दर किंवा हमीभाव कापसाला तिथे दिला जात आहे.

तेलंगणात पुढील आठवड्यात खरेदी सुरू होणार आहे.  सध्या देशात सुमारे 53 खरेदी केंद्र सीसीआयचे सुरू आहेत . तेलंगणामध्ये 120 खरेदी केंद्र सुरू होणार आहेत.  महाराष्ट्रातही किती केंद्र सुरू करायचे आहे याचे नियोजन झाले आहे.  परंतु महाराष्ट्रातील खरेदी दिवाळीनंतर सुरू होईल असेही संकेत सीसीआयच्या सूत्राने दिले आहेत.

कापसाचे दर राज्यात हमीभावापेक्षा अधिक अल्प शेतकऱ्यांना किंवा कापूस उत्पादकांना सध्या मिळत आहेत. कमाल दर खानदेश, पश्चिम विदर्भात हमीभावापेक्षा कमीच आहेत.  उत्तर भारतातही दरावर दबाव वाढला आहे.  देशातील कापूस प्रक्रिया उद्योग रखडत सुरू आहे. जिनिंग  प्रेसिंग कारखानदार कापूस दरामधील चढउताराने वित्तीय संकटांचा सामना करीत आहेत.  त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याची आवश्यकता लक्षात घेता सरकारने बाजारात हस्तक्षेप केला असून खरेदी सुरू केली आहे.

उत्तर भारतामध्ये,  मध्यप्रदेश सह सुमारे दहा लाख कापूस गाठींच्या एक गाठ १७० किलो रुई खरेदीची नियोजन तूर्त सरकारने केली आहे. तसेच तेलंगणामध्ये सुमारे पाच लाख गाठींची खरेदी केले जाईल या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील खरेदी अधिकची असणार आहे . अशी माहिती मिळाली.

राज्यामध्ये यंदा सुमारे 42 लाख हेक्टर वर कापसाची लागवड करण्यात आली आहे.  त्या माध्यमातून सुमारे 400 लाख क्विंटल कापसाचे उत्पादकतेचा अंदाज आहे . महाराष्ट्रात अकोला व छत्रपती संभाजीनगर या विभागाअंतर्गत कापूस खरेदी संबंधी सुमारे 162 खरेदी केंद्र सीसीआय सुरू करण्याच्या तयारीत आहेत . यात सर्वाधिक केंद्र विदर्भात असतील.  खरेदी केंद्र निश्चित आहेत . त्यात खरेदी संबंधीची तयारी देखील झाली आहे.  कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील सीसीआयने केली आहे.  असे सांगण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *