ज्वारीसाठी रब्बीचा विमा एक रुपयात, 30 नोव्हेंबरची मुदत..

जिल्ह्यात पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत रब्बी पिकासाठी विमा काढण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.  खरीप पिक विम्याप्रमाणेच  रब्बी पिकासाठी देखील शेतकऱ्यांचा हिस्सा शासनाकडून दिला जाईल.

शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरावा लागणार आहे.  या विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे  प्रभारी कृषी अधिक्षक कृषी अधिकारी रवी शंकर चलवंदे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी पीक विमा काढला तर पिकांना विम्याचे संरक्षण मिळते,  त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकते.  त्यामुळे पिक विमा काढणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.

त्यातच आता पिक पीकविम्याचा हप्ता शासनाकडून भरला जाणार असून खरीप पिक विमा जिल्ह्यात चार लाख 54 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता.  ज्वारीचा पिक विमा काढण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंतची मुदत आहे.  हरभरा, गहू ,रब्बी कांद्यासाठी पंधरा डिसेंबर पर्यंतची मुदत आहे.

भात उन्हाळी भुईमुगासाठी 31 मार्चपर्यंत विमा काढता येणार आहे.  ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे . अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदारांच्या व्यतिरिक्त भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळू शकते.

ही कागदपत्रे आवश्यक

शेतकरी आपला पिक विम्याचा  अर्ज सीसीएससी केंद्रावर जाऊन भरू शकतात.  यासाठी शेतकऱ्यांना पिक विमा भरताना आधार कार्ड, आधार नोंदणीची प्रत, सात बारा उतारा, भाडेपट्टीची शेती असेल तर त्यासाठीचा करारनामा ,सहमती पत्र, पीक पेरणी स्वयंघोषणापत्र आणि पासबुकची प्रत सादर करून इलेक्ट्रॉनिक साक्षांकन करणे बंधनकारक आहे. पिक विमा भरताना शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचा खाते क्रमांक पिकाखालील क्षेत्र भूमापन क्रमांक इत्यादींची खातरजमा करावी.

Leave a Reply