मोझांबिकमधून तूर आयात थांबली,वाचा सविस्तर ..

भारताने दबाव वाढवून देखील मोझांबिकने स्वस्त भावात तूर देण्यास नकार दिला आहे .  त्यामुळे मोझांबिकमधील निर्यातदारांनी कोर्टात धाव घेतली होती पण तरी देखील शेवटी भारताला चांगला झटका बसला आहे.

यामुळे आफ्रिकेतील इतर देशांच्या तुरीचेही भाव वाढले. तर देशातील महत्त्वाच्या तूर उत्पादक महाराष्ट्र आणि कर्नाटकात तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तूर उत्पादनात आणखी घट होण्याचा अंदाज असून दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज आहे.

 वर्षाला दोन लाख टन तूर आयातीचे करार भारताने मोझांबिकसोबत केले आहेत. म्हणजेच भारताला  मोझांबिक दोन लाख टन तूर देणार. आता तुरीचा भारताला तुटवडा जाणवतो. यामुळे तुरीचे भाव चांगलेच वाढले आहेत. मोझांबिकमध्ये  नेमके याच काळात तुरीची उपलब्धता आहे. मोझांबिकने तुरीचे भाव कमी करण्यासाठी सर्व तूर भारताला लगेच निर्यात करावी, असा दबाव भारताच्या वतीने टाकण्यात आला.

दीड ते दोन लाख टन तुरीचा  स्टॉक मोझांबिकमध्ये आहे, मात्र येतील निर्यातदार निर्यात करत नाहीत, त्यांना भारताच्या अडचणीचा फायदा घेऊन जास्त भाव वसूल करायचाय, अशी मांडणी करत भारतातील आयातदारांनी मोझांबिकशी केलेले करार रद्द करण्याची मागणी केली.मोझांबिक सरकारशी  केंद्र सरकारने  अनेकदा चर्चाही केली.

केंद्र सरकारने सर्व प्रयत्न करूनही मोझांबिकमधून  आयात वाढत नव्हती . कारण होते करार.  भारताचा करार दोन लाख टनाचा झाला आहे ,असे मोझांबिकमधील  निर्यातदारांचे म्हणणे आहे की फक्त दोन लाख टनाचेच करार आहेत.

या दोन लाख टन निर्यातीसाठीच निर्यातदारांना सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन म्हणजेच ही तूर नेमकी कुठे उत्पादित झाली याची माहिती द्यावी लागेल.  यापेक्षा अधिक अधिकच्या तुरीला हे सर्टिफिकेट लागू होणार नाही.  नेमका हाच मुद्दा घेऊन मोझांबिकमधील निर्यातदाराने कोर्टात धाव घेतली होती. 

मोझांबिक कोर्टाने तेथील निर्यातदारांच्या बाजूने निकाल देत दोन लाख टना पेक्षा जास्त तूर निर्यात थांबवली . तसेच कोर्टाने सर्टिफिकेट ऑफ ओरिजिनलाही  स्थगिती दिली.  यामुळे भारताला मोठा फटका बसला आहे. 

आफ्रिकेतील इतर देशांकडे मोझांबिकमधून आयात थांबल्याने  तुरीची मागणी वाढली. देशातील आयातदार मालावी, टांझानिया, युगांडा आणि केनिया या देशांकडे तुरीची चाचपणी करत आहेत. यामुळे या देशांच्या तुरीच्या दरातही वाढ झाली. या देशांच्या तुरीला ८ हजार ते ९ हजारांचा भाव मिळत आहे.

देशामध्ये तूर पिकाचे नुकसान वाढले..

देशातही तुरीच्या पिकांना पावसाचा जोरदार फटका बसला ,26 नोव्हेंबर पासून झालेल्या पावसामुळे महाराष्ट्र तुरीचे उत्पादन राज्यातील नगर ,मराठवाडा आणि विदर्भ या महत्त्वाच्या भागात पिकांचे नुकसान झाले.  फुलगळ झाली.  पिक आडवे झाले.  कर्नाटकातही नुकसान झाले होते ,यात आताही कर्नाटकात मिगजौम चक्रीवादळामुळे जोरदार वारे आणि पावसामुळे पिकांचे नुकसान वाढले म्हणजेच  तूर पिकाचे  नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे.  त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे.

दर टिकून राहण्याची शक्यता.

तुरीला देशातील बाजारात 9 हजार ते 11 हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत.   नवा माल पुढील महिन्याभरात बाजारात दाखल होऊ शकतो त्यामुळे दरात काहीसे चढ-उतार होत आहेत.  पण तुरीचा जुना माल कमी आहे.  नवा मालही कमीच असेल त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी कायम राहील.

म्यानमारच्या मालाचा काहीसा दबाव असेल. परंतु तुरीची टंचाई मोठ्या प्रमाणात असल्याने तुरीचा भाव टिकून राहू शकतो.  त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल  विकताना या गोष्टीवर लक्ष ठेवून विक्रीचे नियोजन केल्यास फायदेशीर ठरेल.  नव्या हंगामात शेतकऱ्यांना तुरीसाठी दहा हजाराचा ही भाव मिळू शकतो.  असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *