Rain forecast : राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे,पहा कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे पाऊस?

राज्यातील अनेक भागात तापमानात चढ उतार सुरु असताना दिसत आहे. तर विदर्भ व मराठवड्यामधील चार जिल्ह्यांमध्ये सलग तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीटीची शक्यता जाणवत आहे , असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.

परभणी,जालना, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये २५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या ३ दिवसामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. माणिकराव खुळे यांनी सांगितले की तुरळक ठिकाणीच गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता आहे.

विदर्भातील गोंदिया, नागपूर,भंडारा, अमरावती अश्या या चार जिल्ह्यांच्या उत्तरेकडील सीमावर्ती तालुक्यामध्ये सोमवारी तुरळक ठिकाणी किरकोळ गारपीट होण्याची शक्यता आहे . परंतु महाराष्ट्रामधील उर्वरित असलेल्या २१ जिल्ह्यामध्ये पाऊस ,वीजा, गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली नाही, असे माणिकराव खुळे यांनी सांगितले .

या कालावधीमध्ये पावसाची शक्यता निर्माण का झाली, या प्रश्नाचे उत्तर देत असताना श्री. खुळे म्हणाले की, फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा काळ हा हिवाळी हंगाम संपून पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरु होण्याचा संक्रमणाचा हा काळ असतो.त्यामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

तामिळनाडूतील कन्याकुमारी ते पूर्व मध्यप्रदेश पर्यंत वारा खंडितता प्रणाली किंवा पूर्व किनारपट्टी समांतर वक्रकार हवेच्या कमी दाबाचा आस साधारणपणे पूर्वमोसमी हंगामात दिसू लागतात. ह्या आस किंवा पट्ट्याच्या पश्चिमेला उत्तेकडून तर पूर्वेला दक्षिणेकडून आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे वीजा, गारांचा पाऊस पडत असतो .

सध्या अश्याच हवेच्या कमी दाबाचा आस सहित वारा खंडितता प्रणाली आहे ,बंगालच्या उपसागरामधील उच्च हवेच्या दाबाच्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यातून आसाच्या पश्चिमेला उत्तेकडून तर पूर्वेला दक्षिणेकडून एक किमी. उंचीपर्यंत वारे वाहत आहेत. यामुळे श्री खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार , फक्त विदर्भ मराठवाड्यामधील १५ जिल्ह्यामध्ये किरकोळ पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

थंडीविषयी बोलताना श्री. खुळे म्हणाले की, २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी पर्यंतच्या ३ दिवसात महाराष्ट्रामधील नगर, नाशिक,सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,रायगड, या जिल्ह्यामध्ये उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पहाटेच्या कमाल ३० ते ३२ अंश सेल्सिअश किमान तापमान तर १४ दरम्यान जाणवत आहे.महाराष्ट्रामधील उर्वरित असलेल्या २७ जिल्ह्यामध्ये ही तापमाने काहीशी जास्त असून ती १७ व ३४ अंश सेल्सिअश दरम्यान जाणवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *