१५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर…

महाराष्ट्र राज्याला १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे.१५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने भारताचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील ही घोषणा केली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी दिल्ली मध्ये १० जुलै रोजी होणाऱ्या सोहळ्यात हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.

या पुरस्कारांसाठी समितीने राज्यातील अन्न सुरक्षा, पर्यावरण रक्षण, यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याची माहिती राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात बांबू लागवड, औष्णिक वीज निर्मितीत बायोमासचा वापर,तृणधान्य श्री अन्न अभियान आणि अशी क्रांतिकारी पावले उचलली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे नाव प्रतिष्ठेच्या मानांकित पुरस्कारावर कोरले गेले आहे असे श्री. पटेल यांनी सांगितले .

तसेच एकवीस लाख हेक्टरवर झाडे लावण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने आता घेतला आहे. मुख्यमंत्री शिंदे हे दगडी कोळसा जाळणे कमी करण्यासाठी कोळशा ऐवजी ५ टक्के बायोमास वापरण्याचे निर्देश दिले आहेत असे करणारे पहिलेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरले आहेत. तसेच गुट्रेस यांचा मानव जात वाचवण्याच्या हाकेला संवेदनशीलतेने प्रतिसाद देत त्यासाठी प्रयत्न करणारे मुख्यमंत्री म्हणून श्री. शिंदे यांची या पुरस्कारासाठी दखल घेतली गेली आहे.

नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या १५ व्या कृषी नेतृत्व संमेलनामध्ये १० जुलै रोजी हा पुरस्कार देण्यात येणार आहे . केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान तसेच ब्राझील, अल्जेरिया, नेदरलँडचे राजदूत, महाराष्ट्र,हिमाचल प्रदेश, नागालँड , यूपी, हरियाणा, या राज्याचे मंत्रीगण व इतर मान्यवर ,केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी,या संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *