गेल्यावर्षी सांगली जिल्ह्यामध्ये पर्जन्यमान कमी झाले होते. खरीप हंगामाला त्यामुळे फटका बसला होता. त्यामुळे जिल्ह्यातील तीन लाख ३९ हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १३८ कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे.
ही रक्कम शेतकऱ्यांनच्या बँक खात्यात जमा झाली आहे .हि मागील चार वर्षातील सर्वात जास्त भरपाई आहे. शेतकऱ्यांना त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरणीसाठी मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. अनेक वेळेस शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या अडचणीना सामोरे जावे लागते. यासाठी सरकारने पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे.
यामध्ये पावसातील खंड, अतिवृष्टी ,दुष्काळ, गारपीट, ढगफुटी, चक्रीवादळ आदी कारणामुळे पिकांचे नुकसान झाल्यावर ज्या पिकांचा विमा उतरवलेला आहे त्या पिकांसाठी भरपाई देण्यात येते. यासाठी एक ठराविक रक्कम अगोदर शेतकऱ्यांना भरावी लागते . तर केंद्र शासन व राज्य बाकीचा भार उचलत होते.
मात्र राज्य शासनाने गेल्यावर्षीपासून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली.एक रुपया भरून शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात . त्यामुळे मागील वर्षी खरीप हंगामात सातारा जिल्ह्यातील पावणेतीन लाखांहून जास्त शेतकऱ्यांनी एक रुपयाची पीक विमा योजना सुरू झाल्यानंतर सहभाग घेतला होता.
पीक विम्याची भरपाई रक्कम वेगवेगळ्या पिकांच्या नुकसानीसाठी दिली जाणार आहे . त्यामुळे पीक विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील तीन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत आहे.पीक नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील दोन लाख ६० हजार शेतकऱ्यांना ११७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
चार वर्षांतील सर्वाधिक मोठी भरपाई
मागील काही वर्षापासून सांगली जिल्ह्यामध्ये पीक विमा योजना राबवली जात आहे. यामध्ये खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी २०२३ मधील मिळणारी रक्कम सर्वाधिक आहे,एक हजार दोन शेतकऱ्यांना ३३ लाख रुपये २०२०-२१ या वर्षात मिळाले.एक हजार ७७७ शेतकऱ्यांना एक कोटी चार लाख रुपये २०२१-२२ या वर्षात मिळाले होते. दोन कोटी २४ लाख रुपयांची विमा भरपाई २०२२-२३ वर्षात दोन हजार २३३ शेतकऱ्यांना मिळाली होती. २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ३ लाख ७७ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. १३८ कोटी रुपये ३ लाख ३९ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहेत.
प्रतिकूल परिस्थितीत होणाऱ्या नुकसानीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा. यासाठी एक रुपया भरावा लागणार आहे. मागील वर्षी खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता, यावर्षीही ५ जुलैपूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत १ सहभाग घ्यावा. – विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली