
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिण’ योजनेच्या यशानंतर आता ‘लाडका भाऊ’ नावाची नवीन योजना सुरू केली आहे. दर महिन्याला ₹10,000 पर्यंत आर्थिक मदत व मोफत कौशल्य प्रशिक्षण या योजनेचा लाभ घेणाऱ्या बेरोजगार तरुणांना मिळेल.
योजनेचे उद्दिष्ट आणि फायदे:
मुख्यमंत्री लाडका भाऊ या योजनेचा मुख्य उद्दिष्ट राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे हा आहे .
कौशल्य प्रशिक्षण: विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल ज्यामुळे त्यांना रोजगार (Employment) मिळवण्यास मदत होईल.
आर्थिक मदत: 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ₹6,000, डिप्लोमाधारकांना ₹8,000 आणि पदवीधर विद्यार्थ्यांना ₹10,000 दरमहा स्टायपेंड दिले जाईल.
स्वयंरोजगार: प्रशिक्षणानंतर, विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत देण्यात येईल.
पात्रता:
अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचा आहे.
12वी, डिप्लोमा किंवा पदवी पास असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असणे गरजेचा आहे.
अर्जदार बेरोजगार असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
निवास प्रमाणपत्र
वय प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो .
इतर आवश्यक कागदपत्रे
अर्ज कसा करावा:
ऑनलाइन आणि ऑफलाइन ‘लाडका भाऊ’ योजनेसाठी अर्ज स्वीकारले (Accepted) जातील. ऑनलाइन अर्जासाठी, अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि आवश्यक माहिती भरा. तुमच्या जिल्ह्यातील रोजगार कार्यालयामध्ये ऑफलाइन अर्जासाठी, संपर्क साधा.
अधिक माहितीसाठी:
तुमच्या जिल्ह्यातील रोजगार कार्यालयात संपर्क साधू शकता. किंवा अधिक माहितीसाठी, तुम्ही ‘लाडका भाऊ’ योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता .