निर्यातक्षम द्राक्षांमध्ये राज्यात हा जिल्हा अग्रेसर , युरोपियन देशातील बाजारपेठ केली काबीज,वाचा सविस्तर ..

सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.या जिल्ह्यातून द्राक्षणा परदेशात चीन, सौदी अरेबिया ,रशिया, युरोप, दुबई, या देशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे व द्राक्ष निर्यातीचा आलेख मागील चार ते पाच वर्षांपासून वाढत आहे.

तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ ,मिरज,या तालुक्यातून युरोप व दुबईला पाठवली जाणारी निर्यातक्षम द्राक्षे तयार केली जातात. द्राक्ष उत्पादक शेतकरी नैसर्गिक आपत्तीवर मात करत निर्यातक्षम द्राक्ष बागा चांगल्या पद्धतीने तयार करतात. निर्यातक्षम द्राक्षांमध्ये राज्यात सांगली जिल्हा अग्रेसर आहे . 

द्राक्ष हे महत्त्वाचे निर्यातक्षम; परंतु कमी कालावधी मध्ये टिकणारे फळ आहे. त्याचा उपयोग मुख्यतः तीन प्रकारे होतो .

◼️ पहिल्या प्रकारामध्ये द्राक्षे ताजी खाण्यासाठी वापरतात.

◼️ दुसऱ्या प्रकारामध्ये द्राक्षांवर प्रक्रिया करून बेदाणा तयार करून खाण्यासाठी वापरतात.

◼️ तिसऱ्या प्रकारामध्ये इतर पेये आणि मद्य बनविण्यासाठी द्राक्षांचा उपयोग केला जातो.

महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात निर्यातक्षम द्राक्षांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. प्रामुख्याने सोनाक्का, एस एस एन, आर के, सुपर सोनाक्का, माणिक चमन या जातीची द्राक्षे परदेशात निर्यात केली जातात.

द्राक्ष वेलीच्या ऑक्टोबर छाटणीला अत्यंत महत्त्व आहे. ऑक्टोबर छाटणीनंतरचे द्राक्ष बागेचे व्यवस्थापन करताना खताचे डोस औषध फवारणी ,पाणीव्यवस्थापन, अचूक वेळेत करणे आवश्यक असते.

पाणी व देठ निरीक्षण ,द्राक्ष वेलीचे माती, मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून करून घेतल्यास उपलब्ध आणि कमतरता असलेले अन्नद्रव्यांची पूर्व कल्पना येते व त्यानुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करता येते. माती परीक्षण करून त्याप्रमाणे खत व्यवस्थापन करावे.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्या पासून युरोपियन आणि इतर देशात निर्यातीस सरुवात होते. जानेवारीपासून युरोपियन देशातील बाजारपेठेत जिल्ह्यातील द्राक्ष पोहोचण्यास सुरुवात होते.

अत्याधुनिक स्वयंचलित ‘वेदर स्टेशन’ हवामान केंद्राची बागेत प्रगतशील शेतकऱ्यांनी उभारणी केली आहे. त्याद्वारे उपलब्ध हवामान घटकांच्या तपशिलाच्या आधारे पीक व्यवस्थापन, या तंत्रज्ञानात ११ सेन्सर्सचा वापर, यामध्ये मुळांच्या कक्षेभोवती ओलावा, हवेतील आर्द्रता, हवेचा दाब, वेग व दिशा, पानांचा ओलावा,मातीचे व हवेचे तापमान, सूर्यप्रकाश तीव्रता आदी बाबी मोजता येतात. जिल्ह्यातून यंदा १३६८ कंटेनरमधून १८ हजार ७७१ मेट्रिक टन द्राक्षे निर्यात चीन,नार्वे, दुबई, सिंगापूर, रशिया, नेदरलँड, तैवान इत्यादी देशात पाठवली आहेत. – भाऊसाहेब एरंडोले, द्राक्ष उत्पादक, मणेराजुरी

Leave a Reply