मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा , केंद्र सरकारची घोषणा ..

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठी शिवाय पाली, आसामी ,बंगाली, आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे . खूप वर्षांपासूनची मराठी माणसाची मागणी केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयामुळे पूर्ण झाली आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांनी देखील केंद्र सरकारच्या अधिवेशनामध्येही मागणी केली होती. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठकीत झाली. त्यानंतर हा निर्णय घेतला गेला .

देवेंद्र फडणवीसांचे कॅबिनेटच्या निर्णयानंतरचे ट्वीट

केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला..

अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे.हा दिवस पाहण्यास मिळावा यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने या विषयी पाठपुरावा केला .पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून मी आभार मानतो.मराठी भाषा ही अभिजातच आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्ञानेश्वरी,लीळाचरित्र, विवेकसिंधू ,अशा अनेक ग्रंथाचा आधार घेण्यात आले . यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे हातभार लागले आहे , मी त्यांचाही खूप आभारी आहे.

नितीन गडकरी काय काय म्हणाले?

नितीन गडकरी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला.या महत्त्वाच्या निर्णयासाठी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या वतीने मन:पूर्वक आभार व महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन! माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली माय मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी व उद्धारासाठी आम्ही कटिबद्ध आणि प्रयत्नशील आहोत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?

🔰 अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.

🔰 सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडीज ची अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर स्थापन करण्यात येते.

🔰 प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेला एक अध्यासन केंद्र स्थापन केले जाते.

Leave a Reply