शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना युरिया खतावर म्हणजेच डीएपीवर भरपूर पैसा खर्च करावा लागतो. तर केंद्र सरकार त्यावर भरघोस सबसिडी (Urea subsidy) देते. अशा परिस्थितीत मोदी सरकार दीर्घकाळापासून अशी खते विकसित करण्यावर भर देत आहे, ज्यामुळे शेतकरी (Agriculture) आणि सरकार दोघांचाही खर्च कमी होईल आणि आता कृषी मंत्रालयाने लिक्विड युरिया म्हणजेच नॅनो डीएपी (Nano DAP) लाँच केली आहे. त्याची किंमत सध्याच्या युरियाच्या निम्म्याहून कमी आहे.
खत कंपनी केली विकसित
लिक्विड नॅनो डीएपी सहकारी क्षेत्रातील खत कंपनी IFFCO (IFFCO) ने विकसित केली आहे. इफकोचे व्यवस्थापकीय संचालक यू. एस. अवस्थी आणि केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. अवस्थी यांनी हे माती आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे वर्णन केले आहे, तर मंत्री मनसुख मांडविया यांनी भारताला स्वावलंबी बनविण्याची ही मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले आहे.
शेतकर्यांसाठी स्वस्त आणि सोयीस्कर
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रसायने आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांनी नॅनो डीएपीचे सोयीस्कर खत म्हणून वर्णन केले. ते म्हणाले की, ते किमतीत स्वस्त आणि शेतकर्यांसाठी वापरण्यास सोयीस्कर असल्याचे सिद्ध होईल. यामुळे सरकारच्या अनुदानातही मोठी बचत होण्यास मदत होणार आहे. नॅनो-डीएपीला द्रव युरिया देखील म्हणतात, जे पारंपारिक दाणेदार युरियापेक्षा बरेच वेगळे आहे. काही काळापूर्वीच्या घोषणेनुसार, हे इंडिया फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह (IFFCO) आणि कोरोमंडल इंटरनॅशनल यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आले आहे.
नॅनो डीएपीनंतर ‘या’ खतांची तयारी
इफकोचे व्यवस्थापकीय संचालक यूएस अवस्थी यांनी एका कृषी परिषदेदरम्यान सांगितले होते की, इफको नॅनो यूरिया आणि नॅनो डीएपी नंतर लवकरच इफको नॅनो-पोटाश, नॅनो-झिंक आणि नॅनो- कॉपर देखील लॉन्च करण्याची योजना आखत आहे. जून 2021 मध्ये, पारंपरिक युरियाला पर्याय म्हणून नॅनो-युरिया द्रव स्वरूपात लाँच करण्यात आला. नॅनो युरियाचे उत्पादन वाढविण्यासाठी उत्पादन प्रकल्पही उभारण्यात आले. आता नॅनो युरिया अनेक देशांमध्ये निर्यात होत आहे. अलीकडे, नॅनो युरियाचे नमुनेही अनेक देशांना पाठवण्यात आले आहेत, त्यापैकी ब्राझीलने इफको नॅनो युरिया द्रव खताला मान्यता दिली आहे.
source- mieshetkari