
जून- २०२३ मध्ये राज्य शासनाने सर्वसमावेशक पीकविमा योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना पीकविमा योजनेत खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही केवळ एक रुपया भरून सहभागी होता येणार आहे. गहू, कांदा व हरभरा यासाठी पीकविमा १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंतभरता येणार आहे.
शेतकऱ्यांना प्रति १ रुपया याप्रमाणे राज्य शासनाने पीकविमा योजनेस सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना पीकविमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास मदत मिळते .
पिकांचे अवकाळी पाऊस व दुष्काळ, अतिवृष्टी, यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पीकविमा काढून घेणे महत्वाचे ठरणार आहे. शेतकऱ्यांनी वेळेवर पीकविमा अर्ज व्यवस्थितपणे भरावा, यामुळे अडचण येणार नाही असे सांगण्यात आले आहे.
पीकविमा भरण्याचे आवाहन
• खरिपातील पिकांना पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची नजर आता रब्बी पिकांवर आहे. त्यामुळे रबी हंगामातील पिकांची नुकसान भरपाई करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा भरणे गरजेचे आहे.
• ज्वारी, कांदा, हरभरा इत्यादी पिकांचा पीकविमा शेतकऱ्यांना १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत भरता येणार आहे. त्यासाठी कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी नायगाव ग्रामपंचायत कर्मचारी लखन राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंठा तालुक्यातील नायगाव येथील माजी सरपंच अविनाश राठोड यांनी केले आहे.
७० टक्के जोखीमस्तर निश्चित..
शेतकऱ्यांनी एका पिकासाठी एक रुपया देऊन खरीप हंगामात विमा भरला होता. केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांचा प्रीमियम पीकविमा कंपनीला दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अग्रिमची रक्कम मिळत आहे.सर्व अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार रब्बीमध्ये देखील शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्यात येणार आहे . अधिसूचित पिकांसाठी पीकविमा योजना लागू राहणार आहे. रब्बी गहू ,कांदा बागायती, ज्वारी बागायती, हरभरा, ही पिके अधिसूचित करण्यात आली आहेत.