मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा,लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100 रुपयांसह वीज बिलात 30 टक्के सूट मिळणार….

आज कोल्हापूरातून महायुतीची संयुक्त सभा होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरातूनच महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिली आहे. ,बाळासाहेब ठाकरे यांनी इथूनच प्रचाराचा शुभारंभ 1995 साली केला होता आणि इतिहास घडला. आजची सभा खूप ऐतिहासिक आहे . नेहमीच आम्हाला आई अंबाबाईने आशीर्वाद दिला आहे, आई अंबाबाई आज देखील आम्हाला आशीर्वाद देईल. यावेळी, विजयाचा गुलाल उधळायला 23 तारखेला इथं येऊ. त्याअगोदर , वचननाम्यातील 10 कलमं जनतेच्यासमोर ठेवतो आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी वचननाम्यातील मोठी घोषणा केल्या आहेत . त्यानुसार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा मिळणार असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली आहे . आम्ही बोलतो ते करुन दाखवतो, असेही एकनाथ शिंदें यांनी सांगितले .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महायुतीच्यावतीने कोल्हापूरच्या प्रचारसभेत 10 वचने जाहीर केली आहेत. भाजपचा जाहीरनामा राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे ,त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणा केल्या . त्यामध्ये, दरमहा 2100 रुपये लाडक्या बहिणींना देण्याचं आश्वासन देण्यात आले आहे . तसेच, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकाही मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय. लाडक्या बहीण योजनेला विरोध म्हणून विरोधक कोर्टात गेले, कोणाच्या माय का लाल आला तरी ही योजना बंद होणार नाही, तुमचे आशीर्वाद मिळाल्यानंतर तुम्हाला देताना आमचे हात आकडते घेणार नाही.

वचननाम्यातील केलेल्या 10 घोषणा..

1) प्रत्येक महिन्याला रु.1500 वरुन लाडक्या बहिणींना रु..2100 देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन देण्यात आले .

2) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून प्रत्येक वर्षाला रु.12,000 वरुन रु.15,000 देण्याचे तसेच MSP वर 20% अनुदान देण्याचे वचन!

3) प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन!

4) वृद्ध पेन्शन धारकांना रु.2100 महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे वचन!

5) राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन!

6) 10 लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 प्रशिक्षणातून महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 विद्यावेतन देण्याचे वचन! तसेच 25 लाख रोजगार निमिर्ती करणार .

7) राज्यातील 45,000 गावांत पाणंद रस्ते बांधणार ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन!

8) अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला रु.15,000 वेतन आणि संरक्षण देण्याचे वचन!

9) सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन त्यासाठी 30% वीज बिलात कपात करणार !

10) ‘व्हिजन महाराष्ट्र@2029 ‘ सरकार स्थापनेनंतर 100 दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *