
Drone pilot course : सेनापती धनाजी जाधव सारथी शेतकरी ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत शेतीसाठीच्या ड्रोन पायलट होण्याची तरुणांना संधी असून त्यासाठी प्रशिक्षणाचा खर्च सारथी मार्फत करण्यात येणार आहे. मात्र अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर असून त्याआधीच अर्ज करावा अशी सूचना संबंधितांनी दिली आहे. ज्या तरुणांचे वय १८ ते ४० असेल, त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
निकष असे आहेत:
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे अन्वये सारथी संचालक मंडळाच्या बैठकीतील मान्य ठरावानुसार राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजातील शेतकरी / युवक/युवती यांना सारथी संस्थेच्या खर्चाने राहूरी व परभणी येथे ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानुसार इच्छुकांना अर्ज सादर करणेसाठी दि. ३१.१२.२०२४ अखेर सायंकाळी ६.१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहेत.
पात्रता अशी आहे:
१. योजना : सेनापती धनाजी जाधव सारथी शेतकरी ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रम २०२४-२५
२. प्रशिक्षण :ड्रोन पायलट प्रशिक्षण
ii) Professional Certificate Course on Drone in Agriculture प्रशिक्षण
३. प्रशिक्षण कालावधी व क्षमता:
अ) ७ व १८० दिवसीय निवासी प्रशिक्षण
४. प्रशिक्षण ठिकाण :
अ) ७ दिवसीय प्रशिक्षणासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
व RPTO, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी
ब) १८० दिवसीय प्रशिक्षणासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
५. प्रशिक्षण शुल्क : प्रशिक्षणार्थी करिता विनामूल्य (सारथी पुणे प्रायोजित)
६. सारथी प्रायोजकत्व (स्पॉन्सरशीप) प्रशिक्षणार्थीचे शुल्क प्रशिक्षणार्थीचे वतीने सारथी संस्थेद्वारा प्रशिक्षण केंद्रास अदा करण्यात येईल.
७. वय : किमान १८ ते ४० वर्षे
लाभार्थी पात्रता :-
1) अर्जदार हा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील असावा.
ii) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.८.०० लाखापेक्षा जास्त नसावे.
iii) ७ दिवसीय प्रशिक्षणाकरिता अर्जदार हा किमान बारावी उत्तीर्ण असावा.
iv) १८० दिवसीय Professional Certificate Course on Drone in Agriculture प्रशिक्षणाकरिता अर्जदार हा किमान विज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण असावी.
v) सारथी, पुणे मार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांचा या अगोदर लाभ घेतलेला नसावा.
आवश्यक कागदपत्रे :-
i) जातीचा दाखला – कुणबी मराठा, मराठा-कुणबी व कुणबी करिता.
शाळा सोडल्याचा दाखला अथवा जातीचा दाखला-मराठा जाती करिता
ii) नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र / EWS प्रमाणपत्र / तहसिलदार यांचा मागील वर्षांचे वार्षिक उत्पन्न
रुपये ८.०० लाख रुपयांपेक्षा जास्त नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (Income Certificate)
iii) आधार कार्ड, हमीपत्र. २ पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो, कोड ऑफ कंडक्ट बाबत हमी पत्र
iv) जन्म दाखला अथवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास दाखला (डोमिसाईल)
v) बैंक अकाउंट तपशील
संपर्क:
विहित नमुन्यातील ऑनलाइन अर्ज www.sarthi-maharashtragov.in लिकवर उपलब्ध आहे.