Kanda Bajarbhav : आज लाल कांद्याला लासलगावी काय भाव मिळतोय?

Kanda Bajarbhav : आज दिनांक ७ डिसेंबर रोजी कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजारात सकाळच्या सत्रात लाल कांद्याचे ५१० नग म्हणजेच सुमारे ३५०० क्विंटल आवक झाली असून किमान बाजारभाव बाजारभाव हजार रुपये तर सरासरी ३८०० रुपये प्रति क्विंटल इतके होते.

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील मनमाड बाजारात आज सकाळच्या सत्रात लाल कांद्याला सरासरी ३३०० रुपयांचा बाजारभाव मिळाला, पुण्यातील पिंपरी बाजारसमितीत लाल कांद्याला सरासरी ३६०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. तर नगर जिल्ह्यातील कर्जत बाजारात सरासरी २५०० रुपये बाजारभाव मिळाला.

काल दिनांक ६ डिसेंबर रोजी लासलगाव बाजारात सुमारे २३ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक होऊन सरासरी बाजारभाव ३८०० रुपये मिळाला. कालच्या तुलनेत आज दरात किरकोळ घसरण पाहायला मिळाली.

दरम्यान पिंपळगाव बसवंत जिल्हा नाशिक येथे पोळ कांदा अर्थातच लेट खरीपाच्या कांद्याची आवक वाढत असून काल दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सुमारे साडे बाजार हजार क्विंटल आवक होऊन पोळ कांद्याला सरासरी प्रति क्विंटल ३८०० रुपयांचा बाजारभाव मिळाला.

Leave a Reply