Sugar crushing and Jagery price : ऊस पट्ट्‌यात गुऱ्हाळघरे सुरू; सध्या गुळाचे व्यवहार कसे होत आहेत..

Sugar crushing and Jagery price:एका बाजूला साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालेला असताना, दुसरीकडे काही गुऱ्हाळघरांमध्येही ऊस गाळपाचे काम सुरू असून नवीन गुळ बाजारात येऊ लागला आहे.

कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या परिसरात अजूनही काही गुऱ्हाळं टिकून आहेत. राज्यात सध्या सरासरी दोन ते अडीच हजार क्विंटल गूळाची आवक होत आहे. सांगली बाजारात गुळाची तुलनेते जास्त आवक होत आहे.

तांबुस गुळाला सरासरी २७०० रुपये प्रति क्विंटल, तर पिवळ्या गुळाला सरासरी ३८०० रुपये बाजारभाव मिळत आहे.

काल दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सांगली बाजारात लोकल गुळाची सुमारे ११०० किवंटल गुळाची आवक झाली, तर गुळाचे भाव सरासरी ३७०० रुपये इतके होते. परवा दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सांगलीत गुळाची सुमारे ११७१ क्विंटल आवक होऊन गुळाचे प्रति क्विंटल बाजारभाव ३६७५ रुपये असे होते.

पुणे बाजारात एक नंबर गुळाला सांगली प्रमाणेच म्हणजेच साधारणत: ३७०० रुपये बाजारभाव मिळताना दिसत आहेत. ६ नोव्हेंबर रोजी पुणे बाजारात कमीत कमी ३७१६ तर सरासरी ३८०० रुपये बाजारभाव मिळाला.

सध्या मुंबईच्या बाजारात लोकल गुळाला चांगला बाजारभाव मिळताना दिसत आहे. मुंबईच्या बाजारात काल दिनांक ६ नोव्हेंबर रोजी कमीत कमी ४८५० रुपये तर सरासरी ५३२५ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे.

Leave a Reply