Onion price : राज्यात आठवड्याच्या सुरूवातीला म्हणजेच सोमवारी कांद्याची बंपर आवक झाली. मात्र भाव टिकून राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काल दिनांक १९ मे रोजी सोमवारी राज्यात सुमारे २ लाख ७५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. एकट्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची १ लाख ८४ हजार ३६५ क्विंटल इतकी कांदा आवक झाली. त्याखालोखाल मुंबईत २० हजार क्विंटल, सोलापूरात लाल कांद्याची १८ हजार क्विंटल, तर अहिल्यानगरमध्ये उन्हाळी कांद्याची १७ हजार तर इतर कांद्याची सुमारे ३ हजार क्विंटल आवक झाली.
संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कांद्याला सरासरी ९५५ रुपये, पुणे जिल्ह्यात सरासरी ८०० रुपये, चिंचवड कांद्याला सरासरी ११००रु, सांगली जिल्ह्यात १२५०, सोलापूरला जिल्ह्यात ९०० रुपये, अहिल्यानगरमध्ये ८५० आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ९२० रुपये सरासरी बाजारभाव मिळाले.
लासलगाव बाजाराचा विचार करता मागच्या आठवड्याप्रमाणेच लासलगावचे बाजारभाव स्थिर राहिले. सोमवारी लासलगाव बाजारात किमान दर ५०० रुपये क्विंटलवर टिकून राहिले. कमाल दरात मात्र ५० रुपयांची प्रति क्विंटल घसरण होऊन १६५१ रुपये बाजारभाव मिळाला. सरासरी ११५० रुपये बाजारभाव मिळाला. पिंपळगाव बसवंतच्या सायखेडा उप बाजारात उन्हाळी कांद्याला सरासरी ९५० रुपये बाजारभाव मिळाला. कोपरगाव बाजारात सरासरी १ हजार, मनमाड बाजारात सरासरी १ हजार, संगमनेर बाजारात ७८८, नाशिक बाजारात ७७५, पुणे गुलटेकडी बाजारात सरासरी १ हजार, सोलापूरला ९०० तर कोल्हापूरला १ हजार रुपये सरासरी बाजारभाव मिळाला.
राज्यात सर्वाधिक बाजारभाव हिंगणा बाजारात जास्तीत जास्त २ हजार रुपये लाल कांद्याला मिळाला, मात्र तेथे आवक केवळ १७ क्विंटल होती. त्या खालोखाल कराड बाजारात हलव्या कांद्याला सरासरी १३०० रुपये, विटा बाजारात १२५० रुपये बाजारभाव मिळाले.












