राज्यात सध्या द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची पळापळ सुरु आहे. असे असताना द्राक्ष कोणत्या देशात निर्यात झाली. यासह शेतकऱ्यांनी द्राक्ष (Grape) कोणत्या निर्यातदाराला दिली. त्यापोटी निर्यातदाराने शेतकऱ्याला पूर्ण द्राक्षाचे पेमेंट केले की नाही, याची खातरजमा करून माहिती संकलित करा, अशा सूचना विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेला दिल्या.
अनेकदा याबाबत फसवणुकीची शक्यता असते. वाघ यांच्या सूचनेनुसार पेमेंटबाबत माहिती संकलित होईल. त्यामुळे पैसे बुडविणाऱ्या निर्यातदारांची माहिती यातून पुढे येईल. या प्रसंगी कृषी उपसंचालक कैलास शिरसाट, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी उपस्थित होते.
शेतकऱ्याचे रासायनिक प्रयोगशाळेत गेलेल्या नमुन्यांच्या नोंदी प्रत्यक्षात निर्यात आकडेवारी, निर्यातीव्यतिरिक्त इतर द्राक्ष कोणत्या ठिकाणी विक्री केली. त्याला किती दर मिळाला, याची माहिती घ्यावी, अशा सूचना वाघ यांनी केल्या.
बागेत जाऊन जेवढा माल निर्यात होईल, तेवढ्याच वजनाचा उल्लेख ‘४-ब प्रपत्रात’ असावा. जास्त वजनाचा उल्लेख केल्यास अनेक निर्यातदार त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असते. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
या व्यवहारामुळे परकीय चलन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते. त्यामुळे शेतकरी, निर्यातदार, प्रयोगशाळा, लॉजिस्टिक व अंतिम ग्राहक यामध्ये शासनाने ज्या नियमावली घालून दिल्या आहेत. त्यास कोणत्याही प्रकारची बाधा येता कामा नये. त्यासाठी कृषी विभागाने कायम सतर्क राहत आहे.
source:- krishijagran