Onion rate : कांद्याच्या दरात स्थैर्य आणण्यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक..

Onion rate : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात अनुदान दुप्पट करावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने निर्यात वाढून दर स्थिर राहण्यास मदत होणार आहे.

📌 पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक राज्यात ५५ लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन असून निर्यातीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. अफवांमुळे दर पाडले जातात, यावर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी अंतर्गत दक्षता समित्या कार्यरत करण्यात आल्या आहेत.

📌 २८ बाजार समित्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद शेतमालाला योग्य मोबदला मिळावा यासाठी बाजार समित्यांनी ठोस भूमिका घ्यावी. अफवा पसरवणाऱ्यांविरोधात स्थानिक पातळीवर कडक कारवाईचे निर्देश.

📌 सोलर बेस कांदा निर्जलीकरण प्रकल्प शेतकरी उत्पादक गट व महिला बचत गटांच्या माध्यमातून राज्यात सोलर बेस कांदा निर्जलीकरण प्रकल्प राबवण्यात येणार. ➡️ अंदाजे १ लाख मेट्रिक टन कांदा निर्जलीकरण ➡️ त्यापासून पावडर व ओनियन चिप्स निर्मिती ➡️ आंतरराष्ट्रीय बाजारात मार्केटिंग