Mka rate : खरीप हंगाम २०२५-२६ साठी मका पिकाची किमान आधारभूत किंमत (MSP) २४०० रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली असली, तरी सध्या बाजारात मक्याचे दर सरासरी १ हजार ते २ हजार रुपयांच्या दरम्यान राहिलेले दिसतात.
वाणानुसार किंमतीत फरक जाणवतो, ज्यामध्ये हायब्रीड, लाल, पिवळा आणि लोकल मका यांचे दर वेगवेगळे आहेत. मागील तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०२२ मध्ये १८७६ रुपये, नोव्हेंबर २०२३ मध्ये २००० रुपये आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये १९३१ रुपये प्रति क्विंटल इतका बाजारभाव मिळाला होता. यावरून दिसते की, मका दरात चढ-उतार कायम असून उत्पादन खर्च, हवामान व मागणी-पुरवठा यांच्या आधारे भाव ठरत आहेत.
नोव्हेंबर २०२५ महिन्यासाठी मक्याचे दर १७१० रुपये ते २००५ रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या तिसऱ्या अग्रिम उत्पादन अंदाजानुसार, सन २०२४-२५ मध्ये राज्यातील मक्याचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत ११.०२ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. तसेच, देशभरात सप्टेंबर २०२५ मध्ये मक्याची आवक सप्टेंबर २०२४ च्या तुलनेत ३३.१५ टक्क्यांनी वाढल्याने बाजारात पुरवठा अधिक झाला आहे. या वाढलेल्या उत्पादन आणि आवकेमुळे दरात थोडीशी घट किंवा स्थिरता दिसून येण्याची शक्यता आहे.












