२०२५ वर्ष संपत असताना नववर्षाच्या सुरुवातीस केवळ नवीन कॅलेंडरच नव्हे, तर अनेक महत्त्वाचे नियमबदल लागू होणार असून त्याचा थेट परिणाम शेतकरी, नोकरदार, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. आर्थिक, डिजिटल आणि सामाजिक क्षेत्रांतील या बदलांमुळे दैनंदिन व्यवहारांपासून भविष्यातील नियोजनापर्यंत अनेक बाबींमध्ये नव्या पद्धती स्वीकाराव्या लागणार आहेत. विशेषतः १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर वयोमर्यादा व पालक नियंत्रण लागू करण्याचा विचार सुरू असल्याने ऑनलाइन सुरक्षिततेवर अधिक भर दिला जाणार आहे.

◼️ क्रेडिट स्कोअर आता १५ दिवसांऐवजी दर आठवड्याला अपडेट केला जाणार असून त्यामुळे कर्जदारांचा आर्थिक इतिहास अधिक पारदर्शक आणि अचूक स्वरूपात दिसेल.
◼️ पॅन–आधार लिंक करणे १ जानेवारीपासून अनिवार्य असणार असून, लिंक न केल्यास बँकिंग व्यवहार तसेच विविध सरकारी सेवांवर मर्यादा येण्याची शक्यता आहे.

सामान्यांसाठी बदल काय?
◼️ नव्या आयटीआर फॉर्म्स येण्याची शक्यता असून त्यामध्ये अनेक आर्थिक व्यवहार आधीच भरलेले असतील, त्यामुळे कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
◼️ नववर्षासोबत इंधन दरांमध्येही बदल होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम दैनंदिन खर्चावर दिसू शकतो.

या सुविधा महाग
◼️ क्रेडिट कार्डद्वारे गेमिंग प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या व्यवहारांवर आता २ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.
◼️ डिजिटल पेमेंट्ससाठी नियम अधिक कडक करण्यात येणार असल्याने व्यवहार करताना अधिक खबरदारी घ्यावी लागेल.
◼️ पेटीएम, अॅमेझॉन, मोबिक्विक यांसारख्या थर्ड पार्टी अॅप्सवरून ५ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठविल्यास १ टक्का शुल्क द्यावे लागणार आहे.