crop insurance : जानेवारीत शेतकऱ्यांना खरीप विमा भरपाईचा लाभ..

crop insurance : खरीप २०२५ हंगामातील पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, राज्य सरकारकडून आवश्यक पीक कापणी प्रयोग व तांत्रिक उत्पादकतेची माहिती केंद्र सरकारला देण्यात आली आहे. केंद्राच्या पोर्टलवर माहिती अपलोड होत असल्याने सोयाबीनसारख्या प्रमुख पिकांसाठी जानेवारीत भरपाई मिळण्याची शक्यता आहे, तर कापूस व तुरीसाठी विलंब होऊन एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. यंदा सुधारित पीकविमा योजनेअंतर्गत काही ट्रिगर वगळण्यात आल्याने आणि पंचनाम्यांऐवजी उत्पादनावर आधारित मूल्यांकन केल्यामुळे अतिवृष्टीने नुकसान होऊनही भरपाईची रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी आणि मका यांसारख्या पिकांचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झाल्याचे आणि त्यासंबंधी तांत्रिक उत्पादकतेची माहिती राज्य कृषी विभागाकडून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेली आहे. यामुळे खरिप पिकांच्या विमा भरपाईसाठी आवश्यक सर्व माहिती केंद्राकडे पोहोचली असून, काही दिवसांत ती केंद्राच्या पोर्टलवर अपलोड केली जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट विमा भरपाई जमा केली जाईल, आणि ही संपूर्ण प्रक्रिया जानेवारी महिन्यात पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

  • विमा योजनेत बदल झाल्यामुळे कंपन्यांना मिळणारा हप्ता मागील वर्षीपेक्षा कमी झाला आहे.

  • यंदा खरीप हंगामासाठी २४०० कोटी रुपयांचा हप्ता कंपन्यांना मिळणार आहे.

  • राज्य सरकारने आर्थिक तरतूद आधीच केली आहे, म्हणजे कंपन्यांना हिस्सा देण्यासाठी निधी राखून ठेवला आहे.

  • विमा भरपाईची रक्कम निश्चित झाल्यानंतर कंपन्यांना लगेच हप्ता देण्यात येईल.

  • जानेवारीत 👉 सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मका आणि इतर खरीप पिकांची विमा भरपाई मिळणार.

  • कापूस व तुरी 👉 सध्या कापणी प्रयोग सुरू आहेत.

    • फेब्रुवारीत प्रयोग पूर्ण होतील.

    • त्यानंतर माहिती अपलोड करून विमा भरपाई निश्चित करण्यासाठी १–१.५ महिने लागतील.

    • त्यामुळे मार्च किंवा एप्रिलमध्ये कापूस व तुरीची विमा भरपाई मिळेल.

  •