काळ्या टमाटरची लागवड ही हिवाळ्यात म्हणजे जानेवारी महिन्यात केलेली उत्तम राहते . लागवडीच्या तीन महिन्यांनी टमाटर लागतात.
काळ्या टमाटरचे पीक सर्वात आधी इंग्लंडमध्ये घेतले गेले ,तिथे त्याला इंडिगो रोज टोमॅटो या नावाने ओळखले जाते. युरोपमध्ये या टमाटर ला सुपरफूड असेही म्हणतात. टमाटर खाणे सर्वानाच आवडते , त्यामध्ये व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन के, व्हिटॅमीन-सी,यांची मात्रा भरपूर प्रमाणामध्ये असते . टमाटरमुळे रक्त वाढण्यास मदत होते , तसेच कित्तेक आजार देखील बरे होतात .
बहुदा लोकं टमाटर सलादच्या रुपात खाणे जास्त पसंत करतात ,तसेच ब्युटी प्रोडक्समध्ये मध्येही याच्या वापर केला जातो . अनेक लोकांना वाटते की, फक्त लाल रंगाचे टमाटर असते ,परंतु तसे नसून काळ्या रंगाचेही टमाटर आहे. काळ्या रंगाच्या टमाटर ची शेती काही राज्यात केली जाते. व भरघोस उत्पन्न काढले जाते .
काळे टमाटर उशिरा लागतात.
उष्ण वायू काळ्या टमाटरच्या शेतीसाठी चांगला समजला जातो. ६ ते ७ मातीचे पीएस असलं पाहिजे. काळ्या टमाटरची शेती ही भारतातील शेतकऱ्यांनसाठी खूप फायदेशीर ठरू शकते, कारण भारतामध्ये उष्ण वायू जास्त भागात आहे. लाल टमाटरपेक्षा काळ्या टमाटरची किंमत जास्त असते .त्यामुळे शेतकऱ्याची चांगली कमाई होऊ शकते.काळ्या टमाटरला मात्र फळं हे जरा उशिरा लागते. परंतु शेतकऱ्यांनी थोडा धीर धरला तर काही वर्षातच लाखों रुपयांची कमाई ते करू शकतात .