जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फुलांची शेती करण्यात येते . प्रत्यक फुलांची किंमत वेगळी आहे . काही फुलांची किंमत महाग असते, तर काही फुलांची किंमत स्वस्त असते .
त्यात काही फुलें अशी हि आहेत कि त्याची किंमत ऐकून तुम्हाला असे वाटेल कि एवढ्या किमती मध्ये मी एक आलिशान कार खरेदी केली असती. तर आपण जाणून घेऊया जगातील सर्वात महाग व सुगंधीत फुला बदल आणि त्याची शेती कोणत्या देशामध्ये शेतकरी करतात .
शेनजेड नांगके ऑर्चिड: जगातील सर्वात महाग फुलं शेनजेड नांगके ऑर्चिडला आहें. त्याची किंमत लाखो रुपया मध्ये आहे व ते दिसायला देखील सुंदर आहे .
२००५ या काळात ८६ लाख रुपये त्याची किंमत होती . आता हाच्या किंमती मध्ये कधाचित वाढ झाली असेल.
सेफरन क्रोकस: वेगळे महत्त्व असलेलं सेफरन क्रोकसचे फुलं सध्या महाग फुलांच्या स्पर्धेत आहें . हाच्या किमतीत तुम्ही महागडी बाईक खरेदी कराल .
या फुलांचा वापर केसर बनविनासाठी होतो . यंदाचा बाजारात केसरचा भाव दोन लाख रुपये किलो आहे . जे शेतकरी सेफरन क्रोकसची शेती करतात त्यांना चांगले पैसे भेटतात .
अमूल्य फूल : श्रीलंकेत होते अमूल्य फुलाची शेती . हें फुलं काडीपूल या नावाने देखील प्रसिद्ध आहे . हे फुल काही तासांना साठी उगवते तेंव्हा त्याला तेव्हड्या वेळात खरेदी करणे खुप कठीण आहे.
ट्युलीप : महागड्या फुलांना मध्ये ट्युलीप हें सुद्धा एक फुलं आहे . या फुलांची किंमत आधी जास्त होती . शेतकरी याची शेती काश्मिरमध्ये करायचे .
जगात ट्युलीपची १७ व्या शतकात मागणी वाढली . ५०० रुपयांपेक्षा अधीक यांच्या एका फुलाची किंमत आहे.
गार्डेनिया : पाच फुलांन मध्ये गार्डेनिया देखील एक खूप महाग फूल आहें . ज्याचा वापर लग्नसमारंभात घर आणि मंडप सजवण्याकरिता केला जातो. ह्या एका फूला ची किंमत १००० ते १६०० रुपये आहे.